India Women Cricket Team Sakal
क्रिकेट

Women's Asia Cup: शिक्कामोर्तब झालं! भारतासह हे तीन संघ खेळणार सेमीफायनल, पाहा संपूर्ण शेड्युल

Pranali Kodre

Women's Asia Cup 2024: महिला आशिया कप २०२४ स्पर्धेत बुधवारी (२४ जुलै) ब गटातील साखळी फेरीचे अखेरचे सामने झाले. त्यामुळे आता उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या अंतिम ४ संघांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या महिला संघांनी स्थान पक्के केले आहे.

अ गटातून भारत आणि पाकिस्तान संघांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. या गटात भारत तीन विजयांसह अव्वल क्रमांकावर राहिला, तर पाकिस्तान दोन विजय आणि एका पराभवासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

आता ब गटातील अखेरच्या साखळी सामन्यांमध्ये बांगलादेशने मलेशियालाला ११४ धावांनी पराभूत केलं, तर श्रीलंकेने १० विकेट्सने थायलंडला पराभूत केलं.

त्यामुळे ब गटात श्रीलंकेने तीन विजयांसह अव्वल क्रमांक मिळवला आहे, तर बांगलादेशने दोन विजय आणि एका पराभवासह दुसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोणाचे सामने कोणाविरुद्ध आणि कधी होणार हे समोर आले आहे.

अ गटात अव्वल क्रमांकावर राहिलेल्या भारतीय महिला संघाचा सामना ब गटातील दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बांगलादेश महिला संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना डंबुला येथे शुक्रवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल.

तसेच ब गटात अव्वल क्रमांकावर राहिलेल्या श्रीलंकेचा सामना अ गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तानविरुद्ध शुक्रवारीच डंबुला येथे संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यांत विजय मिळवणारे संघ रविवारी अंतिम सामन्यात आमने-सामने येतील.

असे आहे महिला आशिया कप बाद फेरीचे वेळापत्रक

उपांत्य फेरी

  • २६ जुलै - भारत विरुद्ध बांगलादेश, डंबुला (वेळ - दु. २.०० वाजता)

  • २६ जुलै - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, डंबुला (वेळ - संध्या. ७.०० वाजता)

अंतिम सामना -

  • २८ जुलै - डंबुला (वेळ - संध्या. ७ वाजता)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT