India Women Cricket Team Sakal
क्रिकेट

Women's T20 World Cup: भारताच्या सेमीफायनलच्या मार्गात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामना ठरणार निर्णायक, जाणून घ्या समीकरण

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे सुरू आहे. १० संघात होणारी ही स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसा रोमांच वाढत आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून दाखल झाला होता.

मात्र भारताला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ५८ धावांनी दारूण पराभव स्विकारावा लागला. पराभवाबरोबरच भारताला नेट रन रेटबाबतही मोठा फटका बसला. उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी नेट रन रेटही महत्त्वाचा असणार आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करत विजय मिळवला. मात्र, भारताला ६ विकेट्सने मिळलेला हा विजयही सहज मिळवता आला नाही त्यामुळे भारताचा नेट रन रेट फारसा वाढला नाही.

त्यामुळेच दोन सामन्यांनंतर भारतीय संघ अ गटाच्या पाँइंट्स टेबलमध्ये सध्या २ गुणांसह आणि -१.२१७ नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. या पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर न्यूझीलंड आहे. त्यांनी एका विजयासह २ गुण मिळवले असून त्यांचा नेट रन रेट २.९०० आहे.

दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनीही एक सामन्यात विजय मिळवला असल्याने त्यांचेही २ गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट १.९०८ आहे. तिसऱ्या क्रमांकावर एक विजय आणि एक पराभवासह पाकिस्तान आहे. त्यांच्या खात्यात २ गुण आणि ०.५५५ नेट रन रेट आहे.

सर्वात शेवटी श्रीलंका आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव स्विकारला असल्याने त्यांचा नेट रन रेट -१.६६७ असा आहे. त्यामुळे आता गुणतालिका पाहिली, तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे आत्तापर्यंत फक्त एकच सामना झाला आहे, तर इतर तीन संघांचे २ सामने झाले आहेत.

त्यामुळे आता मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान होणारा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना भारतीय संघाचा पुढील मार्ग ठरवण्यासाठीही महत्त्वाचा आहे.

भारतासमोरील समीकरण

जर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले, तर भारतासाठी फायदा होईल. पण असे झाले, तरी भारताला पुढे होणारे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने जिंकावेच लागणार आहे. त्याचबरोबर अशीही आशा करावी लागेल की पाकिस्तान पुढील किमान एक सामना तरी पराभूत होईल.

तसेच जर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवले, तर मात्र भारतासाठी पुढील आव्हान कठीण होईल. कारण असे झाले, तर न्यूझीलंडबरोबर ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेटही पार करण्याचे आव्हान भारताला असेल.

असं झालं, तर भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट रन रेट वाढवावा लागेल. त्याचबरोबर पाकिस्तानने सामने पराभूत व्हावे याचीही आशा बाळगावी लागेल.

एकूणच आता भारतासमोर आता सर्वात उत्तम पर्याय हाच आहे की पुढील दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकायचे. असे झाले, तरच भारतासाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडू शकतात. जर भारताने एक पराभव जरी पत्करला, तरी उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा जिवंत राहतील, मात्र संधी अत्यंत कमी असेल. तसेच भारताला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहवं लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitesh Rane: अटक टाळण्यासाठी नितेश राणेंची हायकोर्टात धाव; काय आहे प्रकरण?

हरियाना, जम्मू-काश्मीरचा निकाल, सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

Women's T20 World Cup: हरमनप्रीत कौर उद्याचा सामना मुकणार? स्मृती मानधनाचं मोठं विधान; नेट रन रेटचं गणितही सांगितले

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

SCROLL FOR NEXT