ind vs aus Women’s T20 WC Bigger misfortune than this captain Harmanpreet Kaur gave a big statement on run out after defeat cricket news in marathi  sakal
क्रिकेट

हरमनप्रीत कौरचे कर्णधारपद जाणार, सोबत...; वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Harmanpreet Kaur Captaincy : भारतीय संघाला महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आणि आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत

Swadesh Ghanekar

Women's T20 World Cup 2024 Harmanpreet Kaur Captaincy: भारतीय महिला क्रिकेट संघाला नवीन कर्णधाराची गरज आहे का, या प्रश्नाचा शोध आता सुरू झाला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता, परंतु हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला साखळी फेरीतूनच माघारी परतावे लागले. भारतीय संघाने चारपैकी २ सामने जिंकले, परंतु न्यूझीलंडने त्यांना मागे टाकून उपांत्य फेरीचे तिकिट पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आणि त्यामुळेच BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

मागील ८ वर्षांत भारतीय महिला संघ प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतच बाहेर पडला. त्यामुळे आता कर्णधार बदलाची वेळ आली आहे का, याचा विचार सुरू झाला आहे. BCCI लवकरच बैठक बोलावणार आहे आणि हरमनप्रीत कौरचे कर्णधारपद जाण्याची शक्यता अधिक आहे. बीसीसीआय, निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्यात लवकरच बैठक होईल आणि त्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वावर चर्चा केली जाणार आहे.

भारतीय संघ आता न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी संघ निवडीबाबतची बैठक होणार आहे आणि त्यातच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाचा निर्णय घेतला जाईल. २०१६ मध्ये हरमनप्रीतने ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेतली होती. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२०च्या वर्ल्ड कपमध्ये बाद फेरीत प्रवेश केला होता, परंतु यंदाच्या पर्वात ते साखळी फेरीत पराभूत झाले. नेतृत्व जाणार असले तरी हरमनप्रीतचे संघातील स्थान कायम राहील.

''महिला संघाला नवीन कर्णधाराची गरज आहे का, यावर बीसीसीआय चर्चा करणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने महिला संघाला जे हवं ते दिलं आणि आता संघाच्या कर्णधारपदी नवीन चेहरा बसवण्याची हिच योग्य वेळ आहे. हरमनप्रीत ही संघाची प्रमुख खेळाडू असेल, परंतु आता बदलाची वेळ आली आहे,''असे सूत्रांनी सांगितले.पुढील वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि त्यासाठीची तयारी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT