Team India | ICC Women's T20 World Cup 2024 Sakal
क्रिकेट

Women's T20 World Cup: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पहिली बॉलिंग करणार, जाणून घ्या दोन्ही टीमची 'प्लेइंग-11'

Pranali Kodre

Women's T20 World Cup 2024, India vs New Zealand: गुरुवारपासून (३ ऑक्टोबर) संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे महिला टी२० वर्ल्ड कपला स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाची मोहिम शुक्रवारपासून (४ ऑक्टोबर) सुरू होत आहे.

भारताचा पहिला सामना दुबईत न्यूझीलंड संघाविरुद्ध होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईनने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागणार आहे.

भारतीय महिला संघाकडूनही यंदा मोठ्या अपेक्षा आहेत. यापूर्वी भारताच्या पुरुष संघाने जूनमध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यांच्या यशाची पुनरावृत्ती भारतीय महिला संघ करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तिच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ अनुभवी आहे. भारताकडे स्मृती मानधना, जेमिमा रोड्रिग्स, शफली वर्मा, दिप्ती शर्मा असे काही अनुभवी खेळाडू आहेत.

भारताने गेल्यावर्षी झालेल्या महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. होती. २०२० मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे. यंदाही भारतीय संघ विजेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.

तसेच न्यूझीलंडलाही यंदा विजेतेपदाची अपेक्षा असेल. त्यांनी यापूर्वी २००९ आणि २०१० साली अंतिम सामने खेळले आहेत, पण त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही. तसेच २०१६ साली उपांत्य फेरीत सामना खेळला आहे.

आमने-सामने आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंड महिला संघ यापूर्वी १३ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील ४ वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर ९ वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

भारत - शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्मधार), जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.

न्यूझीलंड - सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिवाईन (कर्मदार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गॅझे (यष्टीरक्षक), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT