Semi final scenario esakal
क्रिकेट

भारतच नव्हे, तर उपांत्य फेरीच्या ३ जागांसाठी ६ संघ शर्यतीत; जाणून घ्या कोणाला किती संधी

Women’s T20 World Cup Semifinal Qualification : महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे आणि भारताचे उपांत्य फेरीचे स्वप्न पाकिस्तानच्या हातात आहे.

Swadesh Ghanekar

Women’s T20 World Cup Semifinal scenario : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने विजयी घोडदौड कायम राखताना महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. ऑस्ट्रेलियाने रविवारी भारतीय संघाचा पराभव करून विजयी चौकार खेचला. अ गटातून ८ गुण व २.२२३ नेट रनरेटसह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. आता अ व ब गटातून उरलेल्या ३ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ रंगणार आहे. भारतीय संघाला अ गटात ४ सामन्यांत २ विजय मिळवता आले आणि ते ४ गुणांसह अजूनही शर्यतीत आहेत. त्यांचे उपांत्य फेरीत खेळण्याचे स्वप्न पाकिस्तानच्या हातात आहे...

अ गटातून ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारत व न्यूझीलंड यांचे प्रत्येकी ४ गुण आहेत आणि नेट रनरेटमुळे टीम इंडिया पुढे आहे. पण, कालची मॅच गमावल्याने भारताच्या हातातून उपांत्य फेरीचं गणित निसटलं आहे. आता त्यांना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यावर अवलंबून रहावे लागेल. न्यूझीलंडने हा सामना जिंकल्यास भारताचे आव्हान संपुष्टात येईल. पण, जर पाकिस्तानने मॅच जिंकली तर भारत उपांत्य फेरीत खेळेल. अशा परिस्थिती कधी नव्हे ते भारतीय क्रिकेटप्रेमी पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना करताना दिसतील. पण, त्याचवेळी जर पाकिस्तानने हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यास नेट रनरेटच्या जोरावर तेही उपांत्य फेरी गाठू शकतात.

ब गटात बराच गोंधळ आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचे प्रत्येकी ६ गुण आहेत. ४ गुण असलेला वेस्ट इंडिजचा संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. बांगलादेश ( २ गुण) व स्कॉटलंड ( ०) यांचे आव्हान साखळी फेरीतच संपले आहे. ब गटात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात शेवटचा साखळी सामना उद्या होणार आहे. यामध्ये वेस्ट इंडिज जिंकल्यास त्यांचेही सहा गुण होतील. अशा वेळी इंग्लंड ( १.७१६), दक्षिण आफ्रिका ( १.३८२) आणि वेस्ट इंडिज ( १.७०८) या संघांचे नेट रनरेट महत्त्वाचे ठरेल. विंडीजने विजय मिळवल्यास ते सरस नेट रनरेटच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचतील. पण, त्याचवेळी इंग्लंडचा नेट रनरेट घसरेल आणि तो जर आफ्रिकेपेक्षा कमी झाला तर त्यांचे आव्हान संपेल.

उर्वरित सामने

  • १४ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, दुबई

  • १५ ऑक्टोबर - इंग्लंड वि. वेस्ट इंडिज, दुबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT