WPL 2024 Points Table Latest Update After GG vs DC Match Marathi News  sakal
क्रिकेट

WPL 2024 Points Table : गुजरातचा पराभवाचा चौकार तर दिल्लीची विजयी हॅट्ट्रिक! कोण आहे पॉइंट टेबल टॉपर?

Kiran Mahanavar

WPL 2024 Points Table : दिल्ली कॅपिटल्सने रविवारी महिला प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमातील तिसऱ्या विजयाला गवसणी घातली. त्यांनी गुजरात जायंट्स संघावर २५ धावांनी मात केली. गुजरातचा संघ यंदाच्या मोसमात विजयापासून दूरच आहे. सलग चौथ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. दिल्लीचा संघ या विजयासह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

दिल्लीकडून गुजरातसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. मात्र गुजरातला २० षटकांत ८ बाद १३८ धावांपर्यंत मजल मारता आली. गुजरातकडून ॲश्‍ले गार्डनर हिने सर्वाधिक ४० धावा केल्या. दिल्लीकडून जेस जॉनासन व राधा यादव यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले.

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हिने ४१ चेंडूंमध्ये सहा चौकार व एक षटकाराच्या साहाय्याने ५५ धावांची खेळी केली. एलिस कॅप्सीने १७ चेंडूंमध्ये २७ धावांची खेळी करीत तिला उत्तम साथ दिली. ॲनाबेल सदरलँड हिने १२ चेंडूंमध्ये २० धावा केल्या. शिखा पांडे हिने तळाला येऊन आठ चेंडूंमध्ये दोन चौकारांसह नाबाद १४ धावांची खेळी केली. दिल्लीने २० षटकांत ८ बाद १६३ धावा फटकावल्या. गुजरातकडून मेघना सिंगने ३७ धावा देत चार फलंदाज बाद केले.

कोण आहे पॉइंट टेबल टॉपर?

गुजरातविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील संघाने गुणतालिकेत मोठा बदल केला आहे. मुंबईला मागे टाकत दिल्ली पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. संघाचा नेट रनरेटही सुधारला आहे. मात्र, दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण आहेत. या सामन्यातील पराभवासह गुजरात पाचव्या स्थानावर कायम आहे. तिसऱ्या क्रमांकावर यूपी वॉरियर्स असून त्यांच्या खात्यात चार गुण आहेत. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स २० षटकांत ८ बाद १६३ धावा (मेग लॅनिंग ५५, एलिस कॅप्सी २७, ॲनाबेल सदरलँड २०, मेघना सिंग ४/३७) विजयी वि. गुजरात जायंट्स २० षटकांत ८ बाद १३८ धावा (ॲश्‍ले गार्डनर ४०, जेस जॉनासन ३/२२, राधा यादव ३/२०).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

China Open 2024 : मालविका बन्सोडचा पुन्हा धडाकेबाज विजय; चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश

Latest Marathi News Updates : आग्रा-दिल्ली रेल्वे मार्गावर ट्रॅक कोसळला; 42 गाड्यांचे बदलले मार्ग

IIFL Finance: आरबीआयने IIFL फायनान्सला दिला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागे, कंपनीच्या शेअर्सवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT