WPL 2024 RCB 
क्रिकेट

WPL 2024 RCB : स्मृतीने हमनप्रीतला दिला धक्का, RCBW ने गतविजेत्या MIW चं पॅक-अप करत गाठली फायनल

WPL 2024 RCB Reached In Final : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात स्मृतीच्या आरसीबीने मुंबईला दिली मात

अनिरुद्ध संकपाळ

WPL 2024 Royal Challengers Bangelore Reached In Final : वुमन्स प्रीमियर लीग 2024 च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने गतविजेत्या मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव करत फायनल गाठली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 135 धावा केल्या होत्या. एलिस पेरीने झुंजार 66 धावांची खेळी केली होती. मुंबईला 20 षटकात 130 धावांपर्यंतच मजल मारता आली.

आरसीबीकडून श्रेयांका पाटीलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. वुमन्स प्रीमियर लीगची फायनल दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यात रविवारी 17 मार्चला होणार आहे.

शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 12 धावांची गरज होती. आशा शोभनाने फक्त 6 धावा देत एक विकेट घेऊन आरसीबीला विजय मिळवून दिला. फायनलमध्ये पोहचल्यानंतर आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

आरसीबीने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर विजयासाठी 136 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईने धडाकेबाज सुरूवात करत 4 षटकात 27 धावांची सलामी दिली होती. मात्र श्रेयांका पाटीलने हेले मॅथ्यूजला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर यस्तिका भाटियाची शिकार एलिस पेरीने केली.

मात्र यानंतर मुंबईच्या ब्रंटने आक्रमक फलंदाजी करत सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेरहेमने तिचा 23 धावांवर त्रिफळा उडवत सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱ्या बाजूने कर्णधार हरमनप्रीत कौरने एक बाजू लावून धरली होती. तिने 30 चेंडूत 33 धावा करत एमिलिया केरसोबत 52 धावांची भागीदारी रचली.

मुंबईची ही जोडी पुन्हा एकदा संघाला फायनलमध्ये घेऊन जाणार असं वाटत असतानाच श्रीयांका पाटीलने कौरला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. कौर बाद झाली त्यावेळी मुंबईा 12 चेंडूत विजयासाठी 16 धावांची गरज होती. मात्र मोलिनिक्सने 19 व्या षटकात फक्त 4 धावा दिल्या. त्यानंतर शोभनाने 20 व्या षटकात फक्त 6 धावा देत आरसीबीला फायनल गाठून दिली.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT