WPL 2024 Delhi Capitals Reach Final Latest Marathi News  
क्रिकेट

WPL 2024 : 5 षटकार... 7 चौकार... शेफाली वर्माची तुफानी खेळी अन् दिल्लीचा संघ थेट दुसऱ्यांदा फायनलमध्ये!

WPL 2024 Delhi Capitals Reach Final : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने बुधवारी येथे झालेल्या साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत गुजरात जायंट्‌स‌ संघावर सात विकेट व ४१ चेंडू राखून विजय मिळवला आणि यंदाच्या मोसमाची अंतिम फेरी गाठली.

Kiran Mahanavar

WPL 2024 Delhi Capitals beats Gujarat Giants : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या मोसमात उपविजेता ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने बुधवारी येथे झालेल्या साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत गुजरात जायंट्‌स‌ संघावर सात विकेट व ४१ चेंडू राखून विजय मिळवला आणि यंदाच्या मोसमाची अंतिम फेरी गाठली. आता एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्स- रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या लढतीतील विजेता संघ दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करील.

गुजरातकडून दिल्लीसमोर १२७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. कर्णधार मेग लॅनिंग (१८ धावा) व एलिस कॅप्सी (०) हे फलंदाज अपयशी ठरले असले तरी शेफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्स या भारतीयांनी धडाकेबाज फलंदाजी करीत दिल्लीला विजय मिळवून दिला. शेफाली हिने ३७ चेंडूंमध्ये सात चौकार व पाच षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. जेमिमा हिने नाबाद ३८ धावांची खेळी करीत तिला उत्तम साथ दिली. गुजरातकडून तनुजा कंवर हिने २० धावा देत दोन फलंदाज बाद केले.

त्याआधी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला; पण दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीसमोर त्यांच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारती फुलमाळी हिने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. दिल्लीकडून मेरीझेन केप, शिखा पांडे व मिन्नू मनी यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. गुजरातने २० षटकांत नऊ बाद १२६ धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT