मुंबई - विशाखापट्टणम व राजकोट या दोन्ही कसोटीत खणखणीत द्विशतकी खेळी साकारणाऱ्या यशस्वी जयस्वाल याने आयसीसी क्रमवारीतही अशीच यशस्वी झेप घेतली आहे. टॉप २० मध्ये स्थान मिळवताना त्याने १४ क्रमांकांची प्रगती केली. आता तो १५ व्या स्थानावर आहे. फलंदाजीच्या या क्रमवारीत रवींद्र जडेजा ३४ व्या, तर शुभमन गिल ३५ व्या स्थानावर विराजमान आहे. सर्फराझ खान व ध्रुव जुरेल या युवा फलंदाजांचाही क्रमवारीत प्रवेश झाला आहे. सर्फराझ ७५ व्या स्थानावर, तर ध्रुव १०० व्या स्थानावर आहे.
आयसीसीकडून मंगळवारी कसोटी क्रमवारी अद्ययावत (अपडेट) करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या क्रमांकावर कायम असून गोलंदाजी व अष्टपैलू या दोन्ही विभागांत पहिल्या दोन स्थानांवर भारतीय क्रिकेटपटूंचेच वर्चस्व दिसून येत आहे. जसप्रीत बुमरा गोलंदाजी विभागात पहिल्या स्थानावर कायम असून रवींद्र जडेजा अष्टपैलू विभागात पहिल्या स्थानावर कायम आहे.
जसप्रीत बुमराने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींत सर्वाधिक १७ फलंदाज बाद करीत आयसीसी गोलंदाजी क्रमवारीतील आपला दबदबा कायम राखला. राजकोट कसोटीत ५०० वा विकेट मिळवणारा रवीचंद्रन अश्विन तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
गोलंदाजी क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारताच्या रवींद्र जडेजाचाही समावेश आहे. राजकोट कसोटीत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जडेजाने तीन स्थानांची प्रगती करून सहावे स्थान पटकावले आहे. मोहम्मद सिराज १९ व्या स्थानावर आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजाने पहिले स्थान, तर रवीचंद्रन अश्विनने दुसरे स्थान कायम राखले आहे. अक्षर पटेल याने एक स्थानाची प्रगती करताना चौथ्या स्थानावर मुसंडी मारली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू अव्वल दहा जणांच्या यादीत आहे. तो सातव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा १२ व्या स्थानावर व रिषभ पंत १४ व्या स्थानावर आहे.
आयसीसी कसोटी क्रमवारी
अव्वल पाच देश
१) ऑस्ट्रेलिया, २) भारत, ३) इंग्लंड, ४)दक्षिण आफ्रिका, ५) न्यूझीलंड
अव्वल पाच फलंदाज
१) केन विल्यमसन, २) स्टीव स्मिथ, ३) डॅरेल मिचेल, ४) बाबर आझम, ५) ज्यो रुट
अव्वल पाच गोलंदाज
१) जसप्रीत बुमरा, २) रवीचंद्रन अश्विन, ३) कागिसो रबाडा, ४) पॅट कमिन्स, ५) जॉश हॅझलवूड
अव्वल पाच अष्टपैलू
१) रवींद्र जडेजा, २) रवीचंद्रन अश्विन, ३) शाकीब हसन, ४) अक्षर पटेल, ५) बेन स्टोक्स
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.