Yashasvi Jaiswal IND vs ENG esakal
क्रिकेट

Yashasvi Jaiswal IND vs ENG : मला मैदान सोडायचं नव्हत मात्र... सामन्यानंतर यशस्वी असं का म्हणाला?

Yashasvi Jaiswal Statement : यशस्वी जैस्वालने सामन्यानंतर त्याच्या मोठ्या खेळीचं रहस्य सांगितलं

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal India vs England : भारताने इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत तब्बल 434 धावांनी पराभव केला. याचबरोबर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2 - 1 अशी आघाडी देखील घेतली आहे. भारताच्या या विजयात सलामीवीर यशस्वी जैस्वालचा मोठा वाटा होता. त्याने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली.

त्याने दुसऱ्या डावात केलेल्या 214 धावांमुळे भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 430 धावांपर्यंत मजल मारली होती. विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी तो पाठदुखीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेला होता. मात्र चौथ्या दिवशी तो फलंदाजीला आला अन् शतकाचं रूपांतर द्विशतकात केलं.

सामना झाल्यानंतर यशस्वी जैस्वालने आपल्या या मोठ्या खेळीचे रहस्य उलगडले. तो समालोचक संजय मांजरेकरांशी बोलताना म्हणाला, 'मी ज्यावेळी सेट होतो त्यावेळी मी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतो. कसोटी क्रिकेटमध्ये मी जेवढावेळ खेळता येईल तेवढे खेळण्याचा प्रयत्न करतो. डावाच्या सुरूवातीला खूप अडचणी येत होत्या. मला धावा करता येत नव्हत्या. त्यावेळी मी सत्र खेळून काढणे आणि गोलंदाज पाहून खेळण्याचा निर्णय घेतला.'

'मी सेट झाल्यानंतर धावांचा वेग वाढवला. मला कोठे फटकेबाजी करायची आहे आणि धावा घ्यायच्या आहेत याबाबत माझा प्लॅन तयार होता.'

यशस्वी जैस्वालने त्याच्या पाठदुखीबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, 'एका क्षणाला माझ्या पाठदुखीने उचल खाल्ली होती. मला मैदान सोडायचं नव्हतं. मात्र पाठदुखी इतकी वाढली होती की मला मैदान सोडावं लागलं.

ज्यावेळी मी चौथ्या दिवशी परत खेळण्यासाठी आलो त्यावेळी मी स्वतःला थोडा वेळ दिला. त्यानंतर जेवढी मोठी खेळी करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न केला. मी जर टिकलो तर सामन्यात भारताची स्थिती मजबूत होणार आहे.'

ज्यावेळी मी सेट होतो त्यावेळी मला मोठी खेळी करणे गरजेचे असते. माझे वरिष्ठ काय सांगतात की सेट झाल्यानंतर मोठी खेळी करा. पहिल्या डावात रोहित भाई आणि जड्डू भाई खेळले त्याने मला प्रेरणा मिळाली. त्यांनी सेशन टू सेशन बॅटिंग केली. त्यामुळे आम्हाला सर्वांना प्रेरणा मिळाली.

भरूचा यांनी यशस्वीला नागपूरजवळच्या तळेगाव गावात सरावासाठी नेलं. कोरोना काळात देखील तो तिथेच सराव करत होता.

भरूचा म्हणाले की, आमचा फॉर्म्युला क्लिअर होता. दिवसात फक्त एकच शॉटचा सराव! 300 कट किंवा 300 रिव्हर्स स्विप किंवा 300 पारंपरिक स्विप शॉट. आम्ही जोपर्यंत फटका खेळण्यात सातत्य येत नाही तोपर्यंत थांबत नव्हतो.'

आम्ही सामन्याचा विचार करणचं सोडून दिलं होतं. तू कसोटी खेळ किंवा टी 20 क्रिकेट चेंडू हा एकाच ठिकाणी पडणार आहे. मात्र त्याचा सामना कसा करायचा आणि त्याच्यावर कसं काम करायंच हेच आमचं उद्दिष्ट होत. जर विशिष्ट दिवशी तू कट शॉट चांगला खेळला नाहीस तर त्या दिवशी आम्ही फक्त कट शॉटवर लक्ष केंद्रित करत होतो.'

भरूचा पुढे म्हणाले की, 'हे सर्व तुमचे कच्चे दुवे दूर करण्यासाठी होतं. त्याच्याकडे ऑन साईडच्या फटक्यांची वैविध्यता नव्हती. आम्ही त्याच्यावर खूप काम केलं आणि त्याचा त्याला फायदा होत आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Seized In Pune: पुण्यात सापडलेलं १३८ कोटींचं सोनं कोणाचं? कुठून कुठे निघाला होता टेम्पो? पोलिसांनी सगळंच सांगून टाकलं

Latest Maharashtra News Updates Live : समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता आणि स्वरा भास्करचा पती फहाद अहमद वाय बी सेंटर येथे दाखल

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरण वाढली; सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला, बँक निफ्टी 1000 अंकांनी कोसळला

IND vs NZ 2nd Test : Washington Sunder चा आणखी एक पराक्रम; मागील १६ वर्षांत अश्विन वगळता कोणालाच जमला नव्हता असा विक्रम

Mudra Loan: मोदी सरकारने दिवाळीत उद्योजकांना दिली मोठी भेट; आता मिळणार 20 लाखांच कर्ज

SCROLL FOR NEXT