Yuvraj Singh Sakal
क्रिकेट

Yuvraj Singh ने सांगितलं अभिनेत्रीशी डेटिंग करताना कशी झालेली फजिती; चाहते म्हणतायेत ती दीपिका तर नव्हती?

Pranali Kodre

Yuvraj Singh News: भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग पूर्वी अनेकदा विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. बऱ्याचदा त्याच्या चर्चा रिलेशनशीपच्या अफवांवरूनही झाल्या आहेत.

दरम्यान, त्याने नंतर २०१६ मध्ये अभिनेत्री हेचल किच हिच्याशी लग्न केले. पण त्याआधी तो एका अभिनेत्रीबरोबर डेटिंग करत होता, याचा खुलासा त्याने स्वत: आता केला आहे. त्यावेळचा एक किस्साही त्याने सांगितला आहे.

क्लब प्रेरी फायर पॉडकास्टमध्ये बोलताना युवराजने सांगितले की २००७ दरम्यान तो एका अभिनेत्रीला डेटिंग करत होता. त्यावेळी तो २००७-०८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला. पण त्या दौऱ्यातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती, त्यामुळे त्याच्यावर दबाव होता. त्यावेळी ती अभिनेत्री ऍडलेडमध्ये शुटिंग करत होती.

पण त्यावेळी त्याने आधी तिला सांगितलं होतं की त्याला भेटू नको सध्या कारण त्याला खेळावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पण ती त्याच्या पाठिमागे कॅनबेराला आली. तिने त्याला सांगितले की तिला त्याच्याबरोबर काहीवेळ घालवायचा आहे.

युवराजने पुढे सांगितले की 'त्यानंतर मी तिला तिला रात्री भेटला आणि गप्पा मारल्या. त्यावेळी मी तिला सांगितले की आपण आता आपल्या करियरवर फोकस करू. कारण मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होतो आणि याचं महत्त्व किती आहे, हे सर्वांना माहितीच आहे. त्यानंतर मला कॅनबेरावरून ऍडलेटला सामन्यासाठी जायचे होते. तेव्हा तिने माझी सुटकेस पॅक केली.'

ती बॅग निघण्यापूर्वीच टीम बसमध्ये भरती करायची होती. त्यामुळे त्याने ती भरलेली सुटकेस पुढे पाठवून दिली. पण नंतर सकाळी त्याच्या लक्षात आले की त्याचे शुज तिथे नाहीत. ते शुजही तिने बॅगमध्ये भरले. त्यावेळी युवराजकडे पायात घालायला चप्पलही नव्हती.

त्याने सांगितलं, 'सकाळी माझ्या लक्षात आलं की माझे शुज कुठे आहेत. ती म्हणाली, मी ते पॅक केले. मी त्यावर विचारलं की आत मी बसमध्ये कसं जाऊ? त्यावर तिने मला पर्याय दिला की तिचे गुलाबी स्लिप-ऑन्स घाल. मला काही सुचत नव्हतं पण मला तो पर्याय निवडावा लागला.'

'मी माझी बॅग पायापुढे धरुन चाललो होते, ज्यामुळे ते गुलाबी स्लिप-ऑन्स लपतील. पण बसमध्ये जेव्हा संघसहकाऱ्यांनी मला पाहिलं, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. मला गुलाबी स्लिप-ऑन्स विमानतळापर्यंत घालावे लागले. त्यानंतर मी विमानतळावर फ्लिप-फ्लॉप्स घेतले.'

दरम्यान, युवराजच्या या किस्स्याच्या क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती अभिनेत्री दीपिका पदुकोण असावी, असे अंदाजही अनेकांनी व्यक्त केले आहेत. तथापि, युवराजने संपूर्ण मुलाखतीत कोणत्याही अभिनेत्रीच्या नावाचा मात्र खुलासा केला नाही.

त्याचे लग्नापूर्वी दीपिका पदुकोण आणि किम शर्मा या अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उज्जैनच्या Mahakal Temple ची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, काही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती

हॅरी पॉटर फेम आणि ऑस्कर विजेत्या अभिनेत्री Maggie Smith यांचे निधन, वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण! संस्थेच्या विश्वस्तांसह प्राचार्यांवर आमदार धंगेकरांचे गंभीर आरोप

Pune Crime News: मुळशीच्या जमिनीचा वाद; दुहेरी हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप

Pune Crime: 'फोनवर कोणाशी बोलतोस?', असं विचारल्याने चिडलेल्या प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT