Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal  esakal
क्रिकेट

Yuzvendra Chahal : झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाची घोषणा होताच युझवेंद्रची कारकीर्द आली संपुष्टात?

अनिरुद्ध संकपाळ

Yuzvendra Chahal : भारताकडून आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा युझवेंद्र चहल हा झिम्बाब्वे विरूद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघात निवडला गेलेला नाही. ही मालिका 6 जुलैपासून सुरू होणार आहे. युझवेंद्र चहलसाठी यंदाचा आयपीएल हंगाम चांगला गेला होता. त्यानंतर त्याची भारतीय टी 20 संघात देखील निवड झाली होती.

मात्र टी 20 मध्ये 2016 मध्ये पदार्पण करून देखील त्याला टी 20 वर्ल्डकप खेळता आला नव्हता. आता त्याची वेस्ट इंडीजमध्ये सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपसाठी निवड झाली. मात्र त्याला अजूनही एकाही सामन्यात खेळवण्यात आलेलं नाही. भारताने टी 20 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. त्यात त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळालेली नाही.

रवी बिश्नोई युझीपेक्षा ठरतोय वरचढ?

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झालेल्या युझवेंद्रसाठी रवी बिश्नोई हा डोकेदुखी ठरत आहे. रवी बिश्नोईची संघात निवड झाली आहे. बिश्नोईची देखील टी 20 वर्ल्डकपमध्ये निवड झाली नव्हती. त्याच्यासाठी आयपीएलचा हंगाम चांगला गेला नव्हता. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यावर चहलऐवजी त्याला संघात स्थान मिळालं आहे.

युझीचं काय बिनसलंय?

- युझीवरचा संघ व्यवस्थापनाचा विश्वास कमी झाला आहे. गेल्या 18 महिन्यात युझीने फक्त 9 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 9 विकेट्स घेतल्या आहेत. बिश्नोईने 2023 मध्ये 11 टी 20 सामने खेळले आहेत.

- युझीने गेल्या टी 20 मालिकेत 5 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. फिरकीला साथ देण्याऱ्या खेळपट्टीवर त्याची ही कामगिरी होती. आयपीएल 2024 मध्ये देखील त्याची अशीच कामगिरी झाली. त्याने पहिल्या 6 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या. तर पुढच्या 9 सामन्यात त्याला 7 विकेट्सच घेता आल्या.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

T20 World Cup: फायनलपूर्वी कॅप्टन रोहितने भारतीय संघाला काय सांगितलं होतं? सूर्याने केला खुलासा

ICC T20I Ranking: हार्दिक पांड्याने रचला इतिहास! रँकिंगमध्ये नंबर वनचा ताज पटकावणारा ठरला पहिलाच भारतीय

Pandharpur Wari : उरुळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा रोखला; घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक दाखल

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

SCROLL FOR NEXT