Gautam Gambhir | Team India Sakal
क्रिकेट

Team India Coach: गौतम गंभीरचा 'माणूस' BCCI ला नकोसा? बॉलिंग कोचसाठी उतरवले दोन तगडे स्पर्धक

Team India Bowling Coach: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर सपोर्ट स्टाफमधील राहुल द्रविडसह इतर सहाय्यक प्रशिक्षकांचाही कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आता गोलंदाजी प्रशिक्षकांसाठी दोन मोठ्या नावांची चर्चा आहे.

Pranali Kodre

Team India Bowling Coach: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडसह सपोर्ट स्टाफमधील फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांचाही कार्यकाळ संपला.

यानंतर बीसीसीआयने ९ जुलै रोजी गौतम गंभीरची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर आता अन्य सहाय्यक प्रशिक्षकांचीही नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. यासाठी अनेक नावं चर्चेत आहेत.

मिडिया रिपोर्ट्सनुसार गंभीरने प्रशिक्षक होण्यापूर्वी बीसीसीआयसमोर सपोर्ट स्टाफ निवडण्याचे अधिकार हवेत अशी अट ठेवली होती. त्यानुसार फलंदाजी प्रशिक्षक म्हणून अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून विनय कुमार यांची नावं त्यानं सुचवल्याचे समोर आले होते.

यातील क्रिकबझच्या वृत्तानुसार अभिषेकचे नाव जवळपास पक्के झाले आहे. मात्र विनय कुमारसाठी बीसीसीआय तयार नसल्याचे समजत आहे.

एनआयला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय गोलंदाजी प्रशिक्षकाच्या पदासाठी झहीर खान आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्या नावाचा विचार करत आहे.

झहीर आणि बालाजी या दोघांनीही भारतासाठी क्रिकेट खेळले असून त्यांना मोठा अनुभवही आहे. झहीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०९ सामन्यांत ६१० विकेट्स घेतल्या आहेत.

झहीर गेले काही वर्षे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत आहे. आता जर झहीर भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झाला, तर त्याला मुंबई इंडियन्समधून बाहेर पडावे लागणार आहे.

बालाजीनेही भारतीय संघाचे ८ कसोटी आणि ३० वनडेत प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीत २७ आणि वनडेत ३४ विकेट्स घेतल्या आहेत. तो बरीच वर्षे आयपीएलमधील संघ चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. मात्र गेल्या दोन वर्षापासून ही जबाबदारी ड्वेन ब्रावो सांभाळत आहे.

दरम्यान, आता गंभीरती मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्याच्यासह अन्य सहाय्यक प्रशिक्षक कोणाची नियुक्ती होणार हे पाहाणं रंजक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT