ZIM vs IND 5th T20I sakal
क्रिकेट

ZIM vs IND 5th T20I : टीम इंडियाची प्लेइंग-11 आज पुन्हा बदलणार? 'या' खेळाडूचा पाचव्या टी-20 मधून पत्ता कट

Kiran Mahanavar

IND vs ZIM 5th T20I Indian Team Playing XI : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा म्हणजेच पाचवा सामना आज (14 जुलै, रविवार) खेळला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथ्या टी-20 मध्ये भारतीय कर्णधार शुभमन गिलने प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करून तुषार देशपांडेचा समावेश केला होता. आता पाचव्या टी-20 मध्येही टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो.

तुषारने झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आता पुढील सामन्यात तुषार देशपांडेचा पत्ता कट होऊ शकतो. पदार्पणाच्या सामन्यात तुषारला विशेष काही करता आले नाही. त्याने 3 षटकात 10 धावांच्या इकॉनॉमीसह 30 धावा दिल्या. यामध्ये त्याला एकच विकेट घेता आली नाही.

आवेश खानच्या जागी तुषार देशपांडेला संघात स्थान मिळाले. अशा परिस्थितीत आवेश खान पाचव्या टी-20मध्ये पुनरागमन करू शकतो आणि तुषार पुन्हा एकदा बेंच दिसू शकतो. आवेशच्या जागी मुकेश कुमारही शेवटच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतो. आता पाचव्या आणि शेवटच्या टी-20मध्ये शुभमन गिल कोणत्या अकरा खेळाडूसह मैदानात उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

टीम इंडियाने जिंकली मालिका

भारतीय संघाने 3-1 अशी अभेद्य आघाडी घेत मालिका जिंकली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने टीम इंडियाचा 13 धावांनी पराभव केला. त्यानंतर टीम इंडियाने पुढचे तीन सामने जिंकून मालिका जिंकली. दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघाने 100 धावांनी, तिसऱ्या टी-20 मध्ये 23 धावांनी आणि चौथ्या टी-20 मध्ये 10 विकेट्सने विजय मिळवला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पाचव्या टी-20 मध्ये टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, गायकवाड, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान/मुकेश कुमार, खलील अहमद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT