Clive Madande  sakal
क्रिकेट

झिम्बाब्वेच्या यष्टिरक्षकाने दिनेश कार्तिकला टाकले मागले, मोडला कसोटीतील ९० वर्ष जुना विक्रम

Ireland vs Zimbabwe Test - कसोटी पदार्पणात गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर क्लाईव्ह मॅडांडेने ९० वर्ष जूना विक्रम मोडून स्वतःच्या नावावर नकोसा पराक्रम नोंदवला

Swadesh Ghanekar

Ireland vs Zimbabwe Test Clive Madande - आयर्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ पहिल्या डावात २१० धावांवर गडगडला. पत्युत्तरात आयर्लंडची अवस्था तशीच राहिली, परंतु त्यांनी ४० धावांची आघाडी कशीबशी मिळवली. त्यांच्याकडून पीटर मूरने केलेल्या खेळीमुळे ही आघाडी मिळाली. पण, आयर्लंडच्या पहिल्या डावातील २५० धावांत झिम्बाब्वेने एकूण ५९ अतिरिक्त धावा दिल्या आणि त्यापैकी ४२ धावा या बाईज ( Byes) होत्या.

युवा क्लाईव्ह मॅडांडे हा या कसोटीतून पदार्पण करतोय आणि त्याचा यष्टिंमागे दिवस काही खास राहिला नाही. त्याने या डावात ४२ बाईज धावा दिल्या आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ९० वर्षांत एका डावात दिल्या गेलेल्या या सर्वाधिक बाईज धावा आहेत. यापूर्वी इंग्लंडच्या यष्टिरक्षक लेस अॅमेस यांनी डावातत ३७ धावा बाईज दिल्या होत्या. त्यानंतर भारताच्या दिनेश कार्तिक व इंग्लंडच्या मॅट प्रायर यांच्या ३५ बाईजचा नकोसा विक्रम होता. कार्तिकने २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध, तर प्रायरने २००९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ही नकोशी कामगिरी केली होती.

मॅडांडेच्या नावावर नकोसा विक्रम जरी नोंदवला गेला असला तरी त्याची यष्टिंमागील कामगिरी तितकी खराब झालेली नाही. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सातत्यपूर्ण व चांगली गोलंदाजी करता आली नाही, हे सत्य आहे. दरम्यान, फलंदाजीत मॅडांडेला काही खास करता आले नाही. अँडी मॅकब्रायनच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो मिड ऑफला क्रेग यंगच्या हाती झेल देऊन परतला.

कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर झिम्बाब्वेने बिनबाद १२ धावा केल्या आणि अजूनही ते २८ धावांनी पिछाडीवर आहेत. मॅडांडेने या सामन्यात एक चांगला झेलही पकडला आणि ७९ धावा करणाऱ्या मूरला त्याने माघारी जाण्यास भाग पाडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT