Cristiano Ronaldo Euro Cup 2024  esakal
क्रीडा

Cristiano Ronaldo : रोनाल्डोची झालीये विराट सारखी अवस्था... पेनल्टी हुकली अन् पोर्तुगालच्या स्टार लागला रडू

अनिरुद्ध संकपाळ

Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : जर्मनीत सुरू असलेल्या युरो कप 2024 च्या राऊंड ऑफ 16 मध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आलं. स्लोवेनिया विरूद्धच्या सामन्यात रोनाल्डोला पेनल्टीवर गोल करता आली नाही. यानंतर रोनाल्डोला आपल्या भावनांवर देखील नियंत्रण राखता आलं नाही. तो मैदानातच रडू लागला.

रोनाल्डो पाठोपाठ त्यांची आई स्टँडमध्ये रडू लागली. जर रोनाल्डोने पेनल्टीवर गोल केला असता तर पोर्तुगालला सामन्यात आघाडी मिळाली असती अन् सामना पेनल्टी शूटआऊटवर गेला नसता. रोनाल्डोने संघाला शेवटच्या काही मिनिटात आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला अपयश आले.

नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली देखील संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नव्हता. मात्र फायनलमध्ये त्याने 76 धावांची झुंजार खेळी केली. यंदाच्या युरो कपमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोला देखील लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही.

दोन्ही संघांना एक्स्ट्रा टाईममध्ये देखील गोल करता आला नव्हता. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊट मध्ये गेला. यावेळी मात्र रोनाल्डोने पहिलीच पेनल्टी मारण्याचा निर्णय घेतला अन् त्यानं गोलपोस्टचा अचूक वेध घेतला. पोर्तुगालने पेनल्टी शूट आऊट 3-0 अशी जिंकली. या विजयासोबतच पोर्तुगालने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. आता पोर्तुगालचा सामना 6 जुलैला फ्रान्ससोबत होणार आहे. जर्मनी अन् स्पेनचा क्वार्टर फायनल सामना हा 5 जुलैला होणार आहे.

पोर्तुगालचा गोलकिपर या सामन्याचा हिरो ठरला. त्याने जोसिप इलिसिक, जुरे बाल्कोवेक आणि बेंजामिन वर्बिक याच्या सलग तीन पेनल्टी सेव्ह केल्या. तर पोर्तुगालकडून रोनाल्डो, ब्रुनो फर्नांडीस, बर्नार्डो सिल्वाने पेनल्टीवर गोल करत पोर्तुगालला 3-0 असा विजय मिळवून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT