जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड लोकप्रियता मिळत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Manchester United) नव्या वर्षाची सुरुवातही नाराजीनं केलीये. याच वर्षी रोनाल्डो जुव्हेंटस क्लबला (juventus) रामराम ठोकत पुन्हा एकदा मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) ताफ्यात परतला होता. पण मागील वर्षात संघातील कामगिरीवर तो खूश नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातच त्याने नाराजी व्यक्त केलीये.
रोनाल्डोने 2021 वर्षाला अलविदा करताना नव्या वर्षांचे स्वागत करणारी एक पोस्ट लिहिलीये. आपल्या चाहत्यांसाठी खास संदेश लिहिताना मँचेस्टरच्या कामगिरीवर असमाधानी असल्याचा उल्लेख रोनाल्डोनं केला आहे. वेगवेगळ्या लीगसह आंतरराष्ट्रीय स्तरावर 47 गोल केले असले तरी हे वर्ष संघर्षमयी होते, असे त्याने म्हटले आहे.
रोनाल्डोने पोस्टमध्ये लिहिलंय की, 'दोन वेगवेगळे क्लब पाच वेगळे प्रशिक्षक, पोर्तुगालसोबत युरो चषकातील कामगिरीनंतर आता 2022 च्या वर्ल्ड कपसाठीचे पात्रता सामने बाकी आहेत. जुव्हेंटसकडून इटालियन कप, इटालियन सुपरकप विजयासह आणि Serie - A टॉप स्कोरर राहिल्याचा अभिमान आहे. यावर्षी युरोमध्ये आघाडीवर राहण्याचा क्षणही अविस्मरणीय होता. याशिवाय ओल्ड ट्रॅफर्डवर पुन्हा परतणे माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे.
परंतु, मँचेस्टर युनायटेडची कामगिरी निराशजनक राहिली. क्लबच्या कामगिरीवर कोणीच आनंदी नाही. आम्हाला खेळात सुधारणा करुन पुढेली काळात दर्जा आणखी उंचावण्याची गरज आहे. नव्या वर्षात नव्या इराद्याने मैदानात उतरु. आगामी वर्षात सर्वोत्तम खेळ करुन कलाटणी देणाऱ्या क्षणाचे साक्षीदार व्हायला आवडेल, असे रोनाल्डोनं म्हटले आहे.
प्रीमियर लीगच्या आतापर्यंतच्या हंगामात मँचेस्टर युनायटेडनं 18 सामने खेळले आहेत. यातील निम्मे म्हणजे 9 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असून 4 लढतीत गुण वाटून घेण्याची वेळ आलीये. त्यांच्या खात्यात 31 गुण असून ते गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहेत. मँचेस्टर युनायटेडनं हंगामाच्या मध्यावरच आपला मॅनेजर बदलला आहे. Ole Gunnar Solksjaer हे सध्या संघाच्या ताफ्यात सामील झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.