Brazil Vs Croatia FIFA World Cup 2022 Dominik Livakovic  esakal
क्रीडा

Livakovic : एकटा लिव्हाकोव्हिक भिडला; 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला दाखवला घरचा रस्ता

अनिरुद्ध संकपाळ

Brazil Vs Croatia FIFA World Cup 2022 : क्रोएशियाने जपानप्रमाणे ब्राझीलचा सामना देखील पेनाल्टी शूटआऊटमध्ये नेला. हा पेनाल्टी शूटआऊटमधील सामना क्रोएशियाने 4 - 2 असा जिंकत फिफा रँकिंगमधील अव्वल स्थानावर असलेल्या ब्राझीलचे पॅक अप केले. क्रोएशियाचा गोलकिपर डॉमिनिक लोव्हाकोव्हिकने संपूर्ण 90 मिनिटे ब्राझीलचे आक्रमण रोखून धरले. तसेच पेनाल्टी शूटआऊटमध्ये पहिलीच पेनाल्टी आडवत ब्राझीलवर दबाव टाकला. तत्पूर्वी, ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारने एक्स्ट्रा टाईमच्या पहिल्या हाफमधील स्टॉपेज टाईममध्ये गोल करत आघाडी घेतली होती. मात्र क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोव्हिकने 116 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली.

फिफा वर्ल्डकपमधीलग पहिला क्वार्टर फायनल सामना गतवेळचे उपविजेते क्रोएशिया आणि फिफा रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या ब्राझील यांच्यात झाला. राऊंड ऑफ 16 मध्ये क्रोएशियाने जपानविरूद्धचा सामना पूर्णवेळ गोलशुन्य बरोबरीत ठेवला होता. तीच रणनिती क्रोएशियाने ब्राझीलविरूद्ध देखील यशस्वीरित्या वापरली. ब्राझीलने संपूर्ण सामन्यात बॉलवर नियंत्रण ठेवत उत्कृष्ट पासिंगच्या जोरावर क्रोएशियाच्या गोलपोस्टवर दबाव वाढवला. मात्र क्रोएशियाची भिंत लिव्हाकोव्हिकने ब्राझीलच्या आक्रमणाला गोलपोस्ट भेदण्याची संधी दिली नाही. ब्राझीलने 90 मिनिटात क्रोएशियावर तब्बल 18 वेळा चढाई केली. त्यातील 8 शॉट्स गोलपोस्टचा अचूक वेध घेणारे होते. मात्र बॉल आणि गोलपोस्टच्या मधी लिव्हाकोव्हिक उभा होता.

एक्स्ट्रा टाईममध्ये देखील ब्राझीलने दमदार सुरूवात करत क्रोएशियाच्या बचाव फळीला आणि गोलकिपरला चांगलेच कामाला लावले. मात्र जसजसा सामना पुढे सरकत गेला क्रोएशियाने आक्रमक चढाया करत ब्राझीलला टेन्शन देण्यास सुरूवात केली होती. मात्र नेमारने एक्स्ट्रा टाईमचा पहिला हाफ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना क्रोएशियाची गोलपोस्ट भेदली. त्याने लिव्हाकोव्हिकला चकावा देत ब्राझीलचा पहिला गोल डागला. यानंतर ब्राझीलला सेमी फायनल गाठण्यासाठी फक्त पुढची 15 मिनिटे क्रोएशियाचे आक्रमण रोखून धरायचे होते. मात्र क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोव्हिकने 117 व्या मिनिटाला ब्राझीलवर गोल करत सामना बरोबरीत आणत पेनाल्टी शूटआऊटमध्ये नेला.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT