MS Dhoni Smoking 
क्रीडा

MS Dhoni Smoking: एमएस धोनीचा हुक्का ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांना मिळाली आयती संधी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन सोशल मीडियावर चर्चेला तोंड फुटले आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी हा हुक्का पिताना दिसत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन सोशल मीडियावर चर्चेला तोंड फुटले आहे. या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी हा हुक्का पिताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. (CSK Captain MS Dhoni Video Of Him Smoking hookah At An Event Goes Viral )

एमएस धोनी याचे फॅन्स आणि त्याचे विरोधक या दोघांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडायला सुरुवात केलीय. धोनीला अनेक लोक एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहत असतात. त्याच्या या व्हिडिओचा संदर्भ घेऊन काहीजण त्याच्यावर टीका करायला लागले आहेत. तरी काहीजण त्याचा बचाव करत असल्याचं दिसत आहेत.

माही काही दिवसांपासून दुबईत असून तो आपल्या सुट्ट्या उपभोगत आहे. धोनीचा हुक्का पितानाचा व्हिडिओ पाहुन अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये धोनी लांब केस आणि फॉर्मल सूट पेहराव केल्याचं दिसत आहे. त्याच्यासोबत लोकांचा ग्रुप देखील आहे. धोनीच्या तोंडून धूर येत असल्याचं दिसत आहे.

धोनीचा व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांनी उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत--

माजी ऑस्ट्रेलिया कर्णधार जॉर्ज बेले याने याआधी धोनीबाबत खुलासा केला होता. धोनीला हुक्का ओढायला आवडतो. तो अनेकदा यासाठी आपल्या खोलीमध्ये तयारी करतो. यावेळी तो इतर खेळाडूंना देखील निमंत्रित करतो. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर हलक्या फुलक्या चर्चा होत असतात, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT