भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांने अखेर 37 वर्षांनंतर आपली बुद्धीबळातील बादशाहत गमावली आहे. आनंद आता देशातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू राहिलेला नाहीये. ग्रँडमास्टर डी गुकेश, हा 17 वर्षीय खेळाडू आता सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय बुद्धिबळपटू बनला आहे. आनंदने तीन दशकांहून अधिक काळानंतर भारताचा अव्वल बुद्धिबळपटू हे स्थान गमावलं आहे. आनंद जुलै 1986 पासून भारताचा अव्वल खेळाडू होता.
अझरबैजान येथे झालेल्या बुध्दीबळ विश्वचषकादरम्यान गुकेशला उपांत्यपूर्व फेरीत मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. तरी देखील तो FIDE क्रमवारीत आनंदच्या पुढे जात जगात 8 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गुकेशने प्रथमच FIDE रेटिंग लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. पाच वेळा विश्वविजेता राहिलेला आनंद आता 9व्या क्रमांकावर आहे.
1 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या FIDE रेटिंगनुसार, गुकेशचे रेटिंग 2758 आहे तर आनंदचे रेटिंग 2754 आहे. गुकेशला 1 ऑगस्टपासून रेटिंग यादीत तीन स्थानांची बढत मिळाली. गुकेशचे सध्याचे रेटिंग 2758 आहे तर आनंदचे रेटिंग 2754 आहे.
गुकेशने बाकू येथे पार पडलेल्या विश्वचषकादरम्यान फिडे रँकिंगमध्ये आनंदला मागे टाकलं होतं. महत्वाचे म्हणजे आंतर जुलै 1986 पासून भारतील टॉप खेळाडू होता. आता 37 वर्षांनंतर त्याने पहिला क्रमांक गमवला आहे.
बुध्दीबळ जगतातील सर्वात तरुण वर्ल्डकप विजेता ठरलेला प्रज्ञानंद 2727 च्या रेटिंगसोबत या यादीत 19 व्या स्थानावर आहेत. तर भारतात गुकेश आणि विश्वानाथन आनंद यांच्या नंतर तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या फिडे रँकिंगमध्ये टॉप 30 मध्ये पाच भारतीय खेळाडूंचा समावेश आहेत. यामध्ये विदित गुजराती (नंबर 27), अर्जुन एरिगेसी ( नंबर 29) यांचा देखील समावेश आहे. तर पी हरिकृष्णा 31 व्या स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.