danielle mcgahey transgender cricketer t20 canada womens t20 world cup qualifier Sakal
क्रीडा

Danielle Mcgahey : कॅनडाची डॅनिली मॅकगेहे पहिली तृतीयपंथी क्रिकेटपटू

टी-२० महिला वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत खेळणार

सकाळ वृत्तसेवा

लंडन : कॅनडाची २९ वर्षीय डॅनिली मॅकगेहे इतिहास घडवणार आहे. कॅनडा या देशाचे ती ट्वेन्टी-२० महिला विश्वकरंडक पात्रता स्पर्धेत प्रतिनिधित्व करेल, तेव्हा ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली तृतीयपंथी क्रिकेटपटू ठरणार आहे.

पुरुष ते महिला तृतीयपंथी असे आयसीसीचे सर्व निकष तिने पार केले आहेत, त्यामुळे आयसीसीकडून तिला खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. टी-२० महिला विश्वकरंडक स्पर्धा पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होत आहे आणि त्यासाठी पात्रता स्पर्धा ४ ते ११ सप्टेंबरदरम्यान बांगलादेशमध्ये होणार आहे. अमेरिका पात्रता गटात होणाऱ्या समन्यांत कॅनडाच्या लढती अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिका यांच्याशी होणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची मिळणारी ही संधी माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते, अशी भावना डॅनिलीने व्यक्त केली.

डॅनिली ही मूळची ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये ती कॅनडामध्ये स्थायिक झाली आणि नोव्हेंबरपासून तिने पुरुष ते महिला असे सामाजिक अवस्थांतर सुरू केले; तर वैद्यकीय संक्रमण मे २०२१ पासून सुरू केले.

सर्वांना समान न्याय आणि समान हक्क असे धोरण असलेल्या आयसीसीने उचललेले हे आणखी एक मोठे पाऊल आहे. डॅनियलच्या या पात्रतेबाबत आयसीसीनेही दुजोरा दिला आहे. त्यासाठी तिने सर्व निकष गाठलेले आहेत, असेही आयसीसीकडून सांगण्यात आले.यापुढे मला प्रत्येक महिन्यात रक्तचाचणी करावी लागणार आहे. खेळत असताना आणि प्रवास करत असताना प्रत्येक महिन्यातील ही रक्तचाचणी आव्हानात्मक असणार आहे, असे डॅनिलीने सांगितले.

कशी झाली निवड

कॅनडामध्ये महिलांची आंतरप्रांतीय क्रिकेट स्पर्धा होत असते, त्यात आपली ओळख स्पष्ट करून तृतीयपंथी त्यात खेळू शकतात. या स्पर्धेत खेळताना डॅनिलीने प्रभावी खेळ केला आणि कॅनडा महिला क्रिकेट निवड समिती सदस्यांनी दखल घेतली. संघात निवड झाल्यानंतर डॅनियल ऑक्टोबर २०२२ मध्ये दक्षिण अमेरिका अजिंक्यपद ट्वेन्टी-२० स्पर्धेत खेळण्यास गेली होती, परंतु त्या स्पर्धेस आंतरराष्ट्रीय दर्जा नव्हता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT