Daniil Medvedev have chance to Revenge from Rafael Nadal  esakal
क्रीडा

Mexican Open: रशियाचा मेद्वेदेव स्पेनच्या नदालचा बदला घेण्यास सज्ज

अनिरुद्ध संकपाळ

रशियाचा (Russia) टेनिसपटू डॅनिल मेदवेदेवने (Daniil Medvedev) जपानच्या योशिहितो निशिओकाचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत मॅक्सिकन ओपनच्या (Mexican Open) सेमी फायनमध्ये दिमाखात प्रवेश केला. आता त्याचा सेमिफायनलमध्ये स्पेनच्या राफेल नदालशी सामना होणार आहे. राफेल नदालने (Rafael Nadal) ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) फायनलमध्ये मेदवेदेवचा झुंजार खेळ करत पराभव केला होता. नदालने पहिले दोन सेट गमल्यानंतर सामन्यात पुनरागमन करत सामना जिंकला होता.

आता मॅक्सिकन ओपनमध्ये (Mexican Open) ऑस्ट्रेलिया ओपनचे हे दोन फायनलिस्ट पुन्हा एकदा भिडणार आहेत. याबाबत बोलताना डॅनिल मेदवेदेव म्हणाला की, 'मला माझा बदला (Revenge) घेण्याची एक प्रकारे संधी मिळणार आहे. तुम्हाला रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच, अँडी मरे यांच्याकडून एक चांगली गोष्ट शिकली पाहिजे. ज्यावेळी ते झुंजार सामन्यात पराभूत झाले आहेत त्यांनी या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न केला आहे.'

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) जेव्हा दुबईमध्ये उपांत्यपूर्व फेरीत हरला त्यानंतर डॅनिल मेदवेदेवचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याचा मार्ग मोकळा झाला. याबाबत त्याला सामना झाल्यावर विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला की, 'ज्यावेळी मला ही बातमी कळाली त्यानंतर सामना खेळणे सोपे नव्हते. ज्यावेळी मला सर्वांचे मेसेज येऊ लागले त्यावेळी मला हे कळाले. मग माझा त्यावर विश्वास बसला.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT