Danish Kaneria Allegation on Shahid Afridi  esakal
क्रीडा

हिंदू असल्यानेच आफ्रिदी माझा छळ करायचा; कनेरियाचा खळबळजनक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर दानिश कनेरियाने (Danish Kaneria) पाकिस्तानी क्रिकेट संघात धर्मिक भेदभाव कसा होतो याबाबत वाचा फोडली होती. आता दानिश कनेरियाने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीवर (Shahid Afridi) गंभीर आरोप केले आहेत. त्याने आयएएनएस वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'आफ्रिदी एक खोटारडा व्यक्ती आहे. त्याने मी हिंदू (Hindu) असूनही पाकिस्तानच्या संघाकडून क्रिकेट खेळत असल्याने माझ्याशी गैरवर्तणूक केली. पाकिस्तानचा माजी वेगावान गोलंदाज शोएब अख्तरने देखील पाकिस्तान क्रिकेट संघात धार्मिक आधारावर भेदभाव (Religion Discrimination) होत होता असा दावा केला होता.

कानेरिया म्हणाला की, 'शोएब अख्तर (Shaib Akhtar) हा पहिला व्यक्ती आहे ज्याने माझी समस्या समजून घेत त्याबाबत उघडपणे बोलला. एक हिंदू असल्याने माझ्यासोबत संघात गैरवर्तणूक होत होती. यावर अख्तर बोलला मी त्याला सलाम करतो. मात्र हे बोलल्यानंतर त्याच्यावर विविध संस्थांनी दबाव टाकला त्यानंतर त्याने या विषयावर बोलणचे बंद केले. मात्र ही गोष्ट खरी आहे की माझ्या सोबत असे घडले होते. शाहिद आफ्रिदी माझा कायम छळ करायचा. आम्ही एकाच विभागात खेळत होते. तो मला सातत्याने बेंचवर बसवायचा आणि वनडे सामन्यात खेळण्याची संधी देत नव्हता.'

दानिश पुढे म्हणाला की, 'आफ्रिदीला मी संघात नको होतो. तो एक खोटारडा माणूस आहे. धोकेबाज आहे. तो एक चरित्रहीन व्यक्ती आहे. माझे लक्ष फक्त क्रिकेट खेळण्यावर होते. त्यामुळे मी त्याच्या कपटीपणावर विशेष लक्ष देत नव्हतो. शाहिद आफ्रिदी हा एकमेव व्यक्ती होता की जो इतर खेळाडूंना माझ्याविषयी काहीतरी सांगून भडकवायचा. मी चांगली कामगिरी करत होतो मात्र तो माझ्यावर जळत होता. मला गर्व आहे की मी पाकिस्तानकडून खेळलो.'

कनेरियावर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला सस्पेंड केले आहे. 41 वर्षाच्या कनेरियाने सांगितले की, 'माझ्याविरूद्ध काही खोटे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात सामील असलेल्या व्यक्तीचे संघातील इतर खेळाडूंशीही चांगले संबंध होते. तो शाहिद आफ्रिदीचा देखील मित्र होता. मात्र या प्रकरणात मलाच टार्गेट केले जात आहे. मी पीसीबीला विनंती करतो की माझ्यावर लावण्याच आलेला प्रतिबंध हटवण्यात यावा. जेणेकरून मी शांतपणे, सन्मानाने जगू शकेन.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT