dasun shanaka Survive After Rohit Sharma Withdraw Mohammed Shami Non Strike Run Out appeal IND vs SL 1st ODI 
क्रीडा

Dasun Shanaka Run Out : नाट्य शेवटच्या षटकातलं…. रोहित होता म्हणून शानकाचं झालं शतक

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात (IND vs SL 1st ODI) भारतीय संघाने श्रीलंकेवर 67 धावांनी विजय मिळवला आहे यासह भारताने 50 षटकांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने मिळवलेला विजय हा श्रीलंकेचा कर्णधार दासुन शानकाच्या शतकामुळे थोडासा झाकाळला. मात्र शनाकाच्या शतकाला भारताचा कर्णधार रोहीत शर्मा जबाबदार ठरला. तो नसता तर हे शतकही झालं नसतं. नेमकं शेवटच्या षटकात काय झालं? (Dasun Shanaka Run Out)

या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या 87 चेंडूत 113 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकांत 373/8 धावा केल्या. लंकन संघासमोर मोठं आव्हान होतं, या स्कोरचा पाठलाग करताना कर्णधार दासून शनाकाने शेवटपर्यंत झुंज दिली. एका क्षणी असे वाटत होते की श्रीलंका हा सामना वाईटरित्या हरणार आहे. शानका शेवटपर्यंत लढत राहिला आणि लंकेचा 67 धावांच्या फरकाने पराभव झाला.

भारताचे 374 धावांचे आव्हान पार करताना श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने झुंजार शतक (नाबाद 108) ठोकत भारताला विजयासाठी 50 व्या षटकापर्यंत फरफरट नेले. त्याने नवव्या विकेटसाठी रजिथासोबत नाबाद शतकी धावांची भागीदारी रचत श्रीलंकेला 50 षटकात 8 बाद 306 धावांपर्यंत पोहचवले.

शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं?

सामन्याच्या शेवटच्या षटकात शनाका 98 धावांवर खेळत होता. तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडवर शमीने शानका याला रनआऊट केलं. आता त्यांचं शतक हुकलं असं वाटत असतानाच कर्णधार रोहित शर्मा पुढे आला आणि हे रन आऊटचं अपील काढून घेतले. रोहितच्या या निर्णयामुळेच झुंजार शनाकाला त्याचे शतक पूर्ण करता आले. रोहितच्या या कृतीचं सध्या सोशल मीडियावर कौतुक केल जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT