David Miller Fighting Century But India Register First T20I Series Win Against South Africa  esakal
क्रीडा

IND vs SA T20 :भारताचा द. आफ्रिकेवर पहिला टी 20 मालिका विजय मात्र मिलर-डिकॉकने गोलंदाजांना रडवले

अनिरुद्ध संकपाळ

IND vs SA 2nd T20I : भारताने ठेवलेले 238 धावांचे आव्हान पार करताना डेव्हिड मिलर (47 चेंडूत नाबाद 106 धावा) आणि क्विंटन डिकॉक (48 चेंडूत 69 धावा) यांनी झुंजार खेळी केली. मात्र या दोघांच्या दीडशतकी (174) भागीदारीनंतरही आफ्रिका 221 धावांपर्यंच पोहचू शकली. भारताने दुसरा टी 20 सामना16 धावांनी जिंकत दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली. भारताची ही सात द्विपक्षीय मालिकेनंतरचा आफ्रिकेविरूद्धचा पहिला टी 20 मालिका विजय आहे.

भारताकडून सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावांची खेळी केली तर केएला राहुलने 57, विराट कोहलीने 49 तर रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीपने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. भारताने 16 ते 20 षटकांमध्ये तब्बल 160 धावा दिल्या. यामुळे पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड्या पडल्या.

भारताने विजयासाठी ठेवलेल्या 238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरूवात खराबा झाली. अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात आफ्रिकेला दोन धक्के दिले. त्याने टेम्बा बाऊमाला आणि रिली रासोव्हला शुन्यावर बाद केले. त्यानंतर एडिन माक्ररमने 19 चेंडूत आक्रमक 33 धावांची खेळी केली. मात्र ही त्याची खेळी अक्षर पटेलने दांडू गुल करत संपवली.

पॉवर प्लेमध्येच तीन धक्के बसल्यानंतर डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक या डावखुऱ्या जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला. डेव्हिड मिलरने तुफान फटकेबाजी करत 12 व्या षटकात आफ्रिकेचे शतक धावफलकावर लावले. त्याला डिकॉकने बॉल टू रन खेळत चांगली साथ दिली. डेव्हिड मिलरने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मिलरनंतर डिकॉकनेही आपला गिअर बदलत 39 चेंडूत अर्धशतकी मजल मारली.

या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत आफ्रिकेला 16 व्या षटकात 150 च्या पार पोहचवले. मात्र त्यानंतर दीपक चाहरने 17 वे षटक चांगला टाकत या दोघांचा झंजावात थोड्याफार प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आफ्रिकेला 12 चेंडूत 63 धावांची गरज होती. अर्शदीपच्या त्या षटकात 26 धावा झाल्या. त्यामुळे आता आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूत 37 धावांची गरज होती.

मिलरने अक्षर पटेलला सलग दोन षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. मात्र अखेर आफ्रिकेला विजयासाठी 16 धावा कमी पडल्या. त्यांना 20 षटकात 3 बाद 221 धावांपर्यंत मजल मारली.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पॉवर प्लेची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांना भारताला पहिल्या 3 षटकात 21 धावांपर्यंतच मजल मारून देता आली. पहिल्या तीन षटकात फारसे हात खोलण्याची संधी न मिळालेल्या रोहित - राहुल जोडीने पुढच्या तीन षटकात तुफान फटकेबाजी करत भारताला 6 षटकात बिनबाद 57 धावांपर्यंत पोहचवले.

त्यानंतर या दोघांनी आक्रमक बाणा कायम राखत शतकी भागीदारीच्या दिशेने कूच केली. दोघांनीही चाळीशी पार करत अर्धशतकी वाटचाल सुरू केली होती. मात्र केशव महाराजने भारताला पहिला धक्का दिला. त्याने रोहितला 43 धावांवर बाद करत रोहित - राहुलची भागीदारी 96 धावांवर संपवली.

त्यानंतर केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र केशव महाराजलाच स्वीप मारण्याच्या नादात तो 57 धावांवर पायचित झाला. भारताचे दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाल्यानंतरही भारताला काही फरक पडला नाही.

कारण सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्येच सेट होऊल आला होता. त्याने 18 चेंडूत दमदार अर्धशतक ठोकत भारताला 15 व्या षटकाच 155 धावांपर्यंत पोहचवले. दुसऱ्या बाजूने त्याला विराट कोहलीने देखील चांगली साथ दिली. या दोघांनी 42 चेंडूतच शतकी भागीदारी रचत भारताला 17 व्या षटकातच 200 चा टप्पा पार करून दिला. मात्र सूर्या 22 चेंडूत 61 धावा करून धावबाद झाला.

त्यानंतर विराट कोहली देखील अर्धशतकाजवळ पोहचला. मात्र शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने आपला जलवा दाखवत 7 चेंडूत 17 धावा करत भारताला 237 धावांपर्यंत पोहचवले. भारताची ही दक्षिण आफ्रिकेविरूद्धची सर्वोच्च टी 20 धावसंख्या ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT