AUS vs PAK 2nd Test David Warner marathi news 
क्रीडा

AUS vs PAK 2nd Test David Warner | वॉर्नर फक्त 6 धावांवर आऊट, तरीही स्टेडियममध्ये झाला टाळ्यांचा कडकडाट, कारण...

Kiran Mahanavar

AUS vs PAK 2nd Test David Warner : क्रिकेटमध्ये नेहमी असे दिसून येते की, जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो, तेव्हा संपूर्ण स्टेडियम उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. परंतु मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जात आहे. आणि यामध्ये आश्चर्यकारक घटना मिळाली. तिसऱ्या दिवशी डेव्हिड वॉर्नर फक्त 6 धावांवर आऊट तरीही संपूर्ण स्टेडियम त्याच्यासाठी उभे राहिले.

डेव्हिड वॉर्नर सहा धावा करून मीर हमजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. वॉर्नरने केवळ 16 चेंडूंचा सामना करत एक चौकार लगावला. वॉर्नर आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतायला लागताच मैदानात उपस्थित सर्व प्रेक्षकांनी आपापल्या जागेवरून उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

वॉर्नरने एवढी मोठी खेळी खेळली नाही की ज्याचे कौतुक करावे, मग प्रेक्षकांनी असे का केले? वास्तविक, वॉर्नरने या मालिकेपूर्वी सांगितले होते की, ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. या मालिकेनंतर तो क्रिकेटला अलविदा करणार आहे.

म्हणजे आता तो पुन्हा बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात फलंदाजी करताना दिसणार नाही. बॉक्सिंग डे सामना हा ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा कसोटी सामना मानला जातो. आणि हा सामना फक्त MCG मध्ये खेळला जातो. या सामन्यात वॉर्नरने शेवटची इनिंग खेळली आहे, म्हणजेच यासोबतच त्याचा बॉक्सिंग डे प्रवास संपला आहे.

यासह वॉर्नरने एमसीजीमध्ये शेवटचा कसोटी सामनाही खेळला. त्यामुळे संपूर्ण स्टेडियमने त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या. निघताना वॉर्नरने आपले हातमोजे एका मुलालाही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT