David Warner Double Hundred in 100th Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी डेव्हिड वॉर्नरने शंभराव्या कसोटीत शतक ठोकले. त्याचा आनंद साजरा होत होता तोपर्यंत या पठ्ठ्याने आपले हे ऐतिहासिक शतक द्विशतकात रूपांतरित केले. डेव्हिड वॉर्नरने 254 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकार मारत 200 धावा ठोकल्या.
ऑस्ट्रेलियाकडून 100 व्या कसोटीत द्विशतक ठोकणारा तो इतिहासातील पहिला क्रिकेटपटू ठरला. मात्र त्याला द्विशतकाचा आनंद फार काळ उपभोगता आला नाही. त्याला पुढच्याच चेंडूवर मैदान सोडावे लागले.
डेव्हिड वॉर्नरने आपल्या शंभराव्या कसोटीत शतकी मजल मारून ऐतिहासिक कामगिरी केली. मात्र झुंजार वॉर्नर इथेच थांबला नाही तर त्याने आपली ही ऐतिहासिक खेळी मोठी करण्याचा निर्धार केला. त्याने आक्रमक फलंदाजी करत आधी दीडशतकी आणि नंतर द्विशतकी मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून आपल्या 100 व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर हा एकमेव फलंदाज ठरला. तर 100 व्या कसोटीत द्विशतक ठोकणारा जो रूट नंतरचा दुसराच फलंजाज ठरला. रूटने भारताविरूद्ध 2021 मध्ये आपल्या शंभराव्या कसोटीत द्विशतक झळकावले होते.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या 76 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर एन्गिडीला चौकार मारत आपले द्विशतक पूर्ण केले. द्विशतक पूर्ण केल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने जोरदार सेलिब्रेशन करत आपली सिग्नेचर उंच उडी मारली. मात्र याचवेळी डेव्हिड वॉर्नरला पुन्हा क्रँम्प आला आणि तो खाली वाकला.
डेव्हिड वॉर्नरने ट्रॅविस हेडच्या साथीने स्वतःला कसे बसे सावरले. षटक संपल्यामुळे ट्रॅविस हेड स्ट्राईकवर होता. हेडने केशव महाराज टाकत असलेल्या 77 व्या षटकाचा पहिला चेंडू खेळला. मात्र तिकडे नॉन स्ट्रायकर एन्डला असलेल्या डेव्हिड वॉर्नरला जास्तच क्रँम्प येऊ लागल्याने त्याने मैदान सोडले. डेव्हिड वॉर्नर रिटायर्ड हर्ट झाला त्यावेळी त्याने 254 चेंडूत नाबाद 200 धावा ठोकल्या होत्या.
हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.