David Warner sakal
क्रीडा

David Warner: 'तो तर म्हातारा... बंदी उठवून काय करणार'! वॉर्नरला दिग्गज चॅपेलनी लगावला टोला

Kiran Mahanavar

David Warner on Ian Chappell : डेव्हिड वॉर्नरला सैंडपेपर गेटमध्ये सहभागासाठी आजीवन कर्णधारपदाची बंदी घालण्यात आली. ऑस्ट्रेलियाने वादग्रस्त घटनेवर आपली भूमिका बदलली. वॉर्नरच्या कर्णधारपदावरील बंदी उठवावी की नाही यावर अनेक तज्ञांनी आपली मते मांडली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी त्यावर मोठे वक्तव्य केले आहे.

डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनवू नये असे इयान चॅपेलने म्हटले आहे. ते म्हणाले की, वॉर्नरच्या कर्णधारपदावरील बंदी उठवण्याची गरज नाही कारण त्याचे वय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होण्यासाठी नाही. वॉर्नरवरील बंदी उठवली तर तो काय करणार आहे? म्हणजे, तुम्ही वॉर्नरला कोणत्याही ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करणार आहे, तो आता म्हातारा झाला आहे. डेव्हिड वॉर्नरचे ते दिवस गेले, कर्णधार तरुण असणे आवश्यक आहे. वॉर्नरकडे आधी ऑस्ट्रेलियन संघाची कमान सोपवली असती तर तो एक उत्तम कर्णधार असल्याचे सिद्ध होऊ शकले असते.

डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती, तर कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर सॅंडपेपरच्या वादानंतर ऑस्ट्रेलियन संघातून नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. यासोबतच वॉर्नरवर कर्णधारपदाची आजीवन बंदी घालण्यात आली होती. स्मिथकडून कर्णधारपदही काढून घेण्यात आले आणि कर्णधार झाल्यानंतर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. 2020 मध्ये स्मिथच्या कर्णधारपदावरील बंदी उठवण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सॅंडपेपरचा वाद ज्या पद्धतीने हाताळला त्यावरही चॅपल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, स्वतःचा बचाव कसा करायचा हे फक्त बोर्डालाच माहीत आहे. ते कधीही खेळाडूंना वाचवण्याचा प्रयत्न करत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT