David Warner esakal
क्रीडा

David Warner : ‘दरवाजे उघडे’ ठेवत वॉर्नरची वनडेतून निवृत्ती

दोन दिवसांनंतर आपला अखेरचा कसोटी सामना खेळणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली.

पीटीआय

सिडनी - दोन दिवसांनंतर आपला अखेरचा कसोटी सामना खेळणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे, परंतु संघाला गरज भासली तर पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी आपण उपलब्ध असू असे सांगत त्याने दरवाजे उघडे ठेवले आहेत.

३७ वर्षीय वॉर्नर ट्वेन्टी-२० प्रकारात मात्र खेळत रहाणार आहे. बुधवारपासून आपले घरचे मैदान असलेल्या सिडनीत पाकिस्तानविरुद्ध होणारा कसोटी सामना आपला अखेरचा कसोटी सामना असणार हे वॉर्नरने अगोदरच जाहीर केलेले आहे.

अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध झालेला एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेतला अंतिम सामना हा आपला अखेरचा एकदिवसीय सामना असल्याचे त्याने म्हटले आहे. या प्रकारातून मी निश्चितच निवृत्त होत आहे, असे सांगत त्याने भारतातील विजेतेपद हे सर्वात मोठे असल्याचे नमूद केले.

परदेशातील लीग खेळण्यास आपण आता मुक्त आहोत, असे सांगणाऱ्या वॉर्नरची दुबईतील आंतरराष्ट्रीय लीगमध्ये दिल्ली फ्रँचाईसच्या दुबई कॅपिटल संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.

विश्‍वविजेत्या संघातील सदस्य

ऑस्ट्रेलियाचा सर्वात धडाकेबाज सलामीवीर म्हणून लौकिक मिळवणाऱ्या वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या दोन विश्वकरंडक विजेत्या संघातील खेळाडू होता. भारतात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतऑस्ट्रेलियाकडून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.

एकदिवसीय प्रकारातून मी निवृत्त होत आहे त्यामुळे मला जगभरातील व्यावसायिक ट्वेन्टी-२० लीगमध्ये मुक्तपणे खेळता येईल. पुढील वर्षी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आहे तोपर्यंत मी चांगला खेळ करत राहिलो आणि ऑस्ट्रेलियाला गरज भासली तर मी उपलब्ध असेन.

- डेव्हिड वॉर्नर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT