David Warner : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटीत 8 विकेट्स राखून पराभव करत तीन कसोटी सामन्यांची मालिका 3 - 0 अशी खिशात घातली. विशेष म्हणजे ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाचा डॅशिंग क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका होती. त्याने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत शेवट गोड केला.
सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरने भावूक प्रतिक्रिया दिली. वॉर्नरने त्याच्या संघ सहकाऱ्यांचे आभार मानले. तो म्हणाला, 'हे सगळं स्वप्नवत होतं. आम्ही मालिका 3 - 0 ने जिंकली. गेली 18 महिने ते दोन वर्षे ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी खूप चांगली गेली आहेत.'
'आम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली अॅशेल मालिका बरोबरीत सोडवली आणि वनडे वर्ल्डकप देखील जिंकला. आता कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी मालिकेत आम्ही 3 -0 ने विजय मिळवला. ही जबरदस्त कामगिरी आहे. मी काही दिग्गज क्रिकेटपटूंसोबत होतो याचा मला अभिमान आहे.'
'पडद्यामागं, इंजिन रूममध्ये अनेक खेळाडूंनी काम केलं. आमचे वेगवान त्रिकुट आणि मिचेल मार्श त्यांनी जीममध्ये कंटाळा न करता काम केलं. या दमदार कामगिरीचं श्रेय त्यांना जातं.'
डेव्हिड वॉर्नरने शेवटच्या दिवशी सकाळी काय केलं हे देखील सांगितलं. तो म्हणाला की, 'आज सकाळी नेट्समध्ये मी काही आमच्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला नाही त्यामुळे भारी वाटतंय. मी फक्त लोकल कॅफेमध्ये वॉक करत गेलो कॉफी घेतली.'
'त्यानंतर मी परत आलो. मी आनंदी आहे आणि मला अभिमान आहे. मी माझ्या घरच्या मैदानावर खेळलो. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीत मला कायम पाठिंबा दिला आहे. त्यांचे जितके आभार मानावेत तितके कमी आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.