Team India sakal
क्रीडा

Team India : टीम इंडियातून बाहेर 'हा' दिग्गज खेळाडू! निवडकर्त्यांच्या एका निर्णयाने संपले करिअर?

Kiran Mahanavar

India vs Ireland T20 Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी 28 वर्षीय खेळाडूचा संघात समावेश केलेला नाही. या खेळाडूने मागील आयर्लंड दौऱ्यावर शानदार शतक झळकावले होते.

अष्टपैलू दीपक हुड्डाचा आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी नुकत्याच निवडलेल्या टीम इंडियामध्ये दीपक हुड्डाला स्थान मिळू शकले नाही. खराब कामगिरीमुळे टी-20 संघातून बाहेर पडला होता आणि आता पुनरागमन अवघड झाले आहे. दीपक हुड्डा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये अहमदाबादमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याच वेळी त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर 2022 मध्ये शेवटचा वनडे खेळला होता.

दीपक हुड्डा यांनी टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण 10 एकदिवसीय आणि 21 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दीपक हुडाने 25.5 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत आणि 3 बळीही घेतले आहेत. त्याच वेळी, त्याने टी-20 मध्ये 30.67 च्या सरासरीने 368 धावा केल्या आहेत. त्‍याने आयर्लंड संघाविरुद्ध टी-20 मध्‍येही शतक झळकावले आहे.

आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप. सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड विरुद्ध भारत टी20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना - 18 ऑगस्ट

  • दुसरा सामना - 20 ऑगस्ट

  • तिसरा सामना - 23 ऑगस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT