Neeraj Chopra 5 Instagram
क्रीडा

पुण्यातील स्टेडियमला दिलं जाणार 'गोल्डन बॉय' नीरजचं नाव

आर्मी मॅनने सुरुवातीला ज्या मैदानात सराव केला त्या मैदानाला आता त्याचे नाव देण्यात येणार आहे.

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला सोनेरी क्षणाची ऐतिहासिक अनुभूती करुन देणाऱ्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. अ‍ॅथलेटिक्समध्ये देशाला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या नीरजवर बक्षीसांची खैरात होत आहे. हा ओघ अजूनही थांबलेला नाही. यात त्याच्या सन्मानार्थ आणखी एक मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्राचे नाव पुण्यातील एका स्टेडियमला देण्यात येणार आहे.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 23 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पुणे स्थित डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ एडवान्स टेक्नोलॉजी आणि आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूटला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते एका स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात येईल.

संरक्षण विभागाच्या एका निवेदनानुसार, संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूट परिसरातील स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 'नीरज चोप्रा आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूट, पुणे छावणी' असे नाव स्टेडियमला देण्यात येणार आहे. यावेळी राजनाथ सिंह सर्विसेसमधील 16 ऑलिम्पियन खेळाडूंचा सत्कारही करतील. नीरज चोप्रा भारतीय सैन्यात नायक सुभेदार पदावर कार्यरत आहे. त्याने पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेतले आहे. ज्या स्टेडियमवर त्याने सराव केला त्या स्टेडियमला नीरजचे नाव देऊन त्याचा गौरव आर्मीकडून करण्यात येईल.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली होती. पात्रताफेरीपासून ते फायनलपर्यंत आपला दबदबा कायम राखत त्याने सुवर्ण कामगिरी करुन दाखवली. अंतिम फेरीतील दुसऱ्या राउंडमध्ये त्याने 87.58 मीटर अंतर भाला फेकून ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतासाठी नवा अध्याय रचला. यंदाच्या स्पर्धेत 7 ऑगस्टला त्याने केलेली कामगिरी ही ऐतिहासिक अशी आहे. ऑलिम्पिकच्या 121 वर्षांच्या इतिहासात अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून देणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT