Defending champions Australia knocked out T20 World Cup 2022 
क्रीडा

T20 WC : डेव्हिड वॉर्नर की फिंच कोणामुळे ऑस्ट्रेलियाची मयादेशात झाली लाजीरवाणी अवस्था

T20 World Cup मधुन ऑस्ट्रेलिया या कारणे बाहेर.... तुम्हाला काय वाटते

Kiran Mahanavar

Australia Knocked Out T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक मध्ये पुन्हा एकदा प्रतिष्ठा कलंकित झाली आहे आणि अनिष्ट परंपरा कायम राहिली. गतविजेते आणि यजमान ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवण्यात अपयश झाली. सुपर-12 फेरीतील गट-1 मधील शेवटच्या सामन्यात इंग्लंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीपूर्वीच प्रवास थांबवावा लागला. पहिल्या सामन्यापासून अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला आज श्रीलंकेवर अवलंबून राहावे लागलं. पण इंग्लंडने सामना जिंकत उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्के केले. ऑस्ट्रेलियाने कुठे चूक केली, जी आपल्याच घरात अपयशी ठरली.

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाची वाईट सुरुवात -

ऑस्ट्रेलियाला जेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता, मात्र त्याची सुरुवात अँटी क्लायमॅक्सने झाली. पहिल्याच सामन्यात त्यांना न्यूझीलंडने 89 धावांनी पराभूत केले होते. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात सर्व फलंदाज सहज बाद झाले. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा नेट रनरेट सुरुवातीपासूनच खाली गेले ते शेवटपर्यंत वर आले नाही.

डेव्हिड वॉर्नर, फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल अपयशी -

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच खराब फॉर्ममध्ये होता. श्रीलंकेविरुद्ध त्याने महत्त्वाची खेळी खेळली, तसेच आयर्लंडविरुद्ध दमदार अर्धशतकही झळकावले, पण तो विशेष लयीत नव्हता. त्याचवेळी गतवर्षीचा स्टार डेव्हिड वॉर्नरही पूर्णपणे अपयशी ठरला. मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही फारसा प्रभाव सोडला नाही

पावसाने गेले सामने वाहून -

ऑस्ट्रेलियामध्ये पावसामुळे अनेक सामन्यांवर परिणाम झाला आहे, यजमानांपैकी एक ऑस्ट्रेलिया होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळणार होता. तो सामना झाला असता तर आजची गोष्ट काही वेगळी असती. परंतु हवामानाने अशी परिस्थिती निर्माण केली की सामना नाणेफेकही होऊ शकली नाही आणि ऑस्ट्रेलियाची जिंकण्याची संधी गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT