Delhi court granted bail to Olympian wrestler Sushil Kumar  esakal
क्रीडा

Sushil Kumar : खुनाचा आरोप असलेल्या कुस्तीपटू सुशिल कुमारला जामीन

अनिरुद्ध संकपाळ

Sushil Kumar Bail : खुनाचा आरोप असलेल्या कुस्तीपटू सुशिल कुमारला दिल्ली न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशिल कुमारवर 27 वर्षाचा कुस्तीपटू सागर धनकरच्या खुनाचा आरोप आहे. सुशिल कुमारला दिल्ली न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.

सुशिल कुमरचे वकील आरएस मलिक यांनी मानवी दृष्टीकोणातून तीन आठवड्यांसाठी सुशिल कुमारला अंतरिम जामीन मिळावा अशी याचिका दाखल केली होती. सुशिल कुमारच्या पत्नीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर तिची काळडी घेण्यासाठी सुशिल कुमारला जामीन मिळावा अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती.

दम्यान, या जामीन याचिकेवर दिल्ली न्यायालयातील अतिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी सुशिल कुमारला जामीन मंजूर केला. यावेळी त्यांनी 'याचिकाकर्त्यांची पत्नी शस्त्रक्रियेनंतर दैनंदिन कामे स्वतः करू शकणार नाही हे आम्ही नाकारत नाही. त्यांना यासाठी काही दिवस दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या पत्नीची वैद्यकीय स्थिती पाहता, तसेच त्यांना दोन अल्पवयीन मुले आहेत या सर्वाचा विचार करता याचिकाकर्ता यावेळी पत्नीजवळ असणे गरजेचे आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे.' असे निरिक्षण नोंदवले.

यानंतर सुशिल कुमारला वैयक्तित 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. सुशिल कुमारच्या पत्नी पाठदुखीने त्रस्त होती. कालांतराने तिचे दुखणे वाढत गेले. त्यामुळे तिला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. सुशिलच्या कायदेशीर सल्लागारांनी जरी कुटुंबात इतर सदस्य असले तरी जर तिचा पती तिथे नसेल तर शस्त्रक्रिया होणार नाही असे कोर्टाला सांगितले.

दरम्यान, सागर धनकर खून प्रकरणातील इतर साक्षीदारांच्या सुरक्षेला धोका पोहचू नये म्हणून न्यायालयाने सुशिल कुमारसोबत कायम दोन सुरक्षा रक्षक ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून सुशिल कुमारवर नजर ठेवता येईल. या सुरक्षा रक्षकांचा दिवसाचा 10 हजार रूपयांचा खर्च सुशिल कुमारला उचलण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT