Swaroop Unhalkar sakal
क्रीडा

Polio मुळे पायातील त्राण गेले, पण कोल्हापूरचा पठ्ठ्या खचला नाही; पॅरिसमध्ये पदकावर साधणार 'नेम'!

Swaroop Unhalkar Paralympic 2024 : पॅरिसमध्ये नेमबाजीत खेळणाऱ्या मराठी खेळाडूचे वडील तेलाच्या दुकानात काम करायचे आणि त्यांची आई आजही कोल्हापुरातील गणेश मंदिरासमोर फुले, अगरबत्ती, हार इत्यादी जीवनावश्यक वस्तू विकण्याचा स्टॉल चालवते.

Swadesh Ghanekar

Kolhapur Swaroop Unhalkar Journey, Paralympic 2024 : ऑलिम्पिक स्पर्धा ही जगभरातल्या खेळाडूंसाठी क्रीडा महोस्तवच... या स्पर्धेची पात्रता मिळवण्यासाठी खेळाडूंना अथक मेहनत घ्यावी लागते आणि त्या मेहनतीच्या जोरावर हे खेळाडू देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्यासाठी तयार असतात... त्यामुळे ऑलिम्पिकचं कोणतंही पदक ही खूप गौरवास्पद गोष्ट आहे आणि हे त्यामागचा खेळाडूंचा प्रवास पाहिल्यास सामान्यांना नक्की प्रेरणा मिळेल... काल भारताला नेमबाज मनू भाकर हिने कांस्यपदक जिंकून दिले... २२ व्या वर्षी आपण काय करायचो, हा साधा प्रश्न जरी स्वतःच्या मनाला विचारला, तर मनूने केवढं मोठं यश मिळवलंय याची जाण होईल.

ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणारी मनू भाकर ही भारताची पहिली महिला नेमबाज ठरली आहे. तिच्या या यशानंतर भारतीय नेमबाजांकडून अधिक पदकाची अपेक्षा आहे आणि त्यानंतर होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेतही भारताचा तिरंगा डौलाने फडकावण्यासाठी कोल्हापूरचा पठ्ठ्या सज्ज झाला. त्याचा प्रवास हा खऱ्या अर्थाने सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ३७ वर्षीय स्वरूप उन्हाळकर ( Swaroop Unhalkar) याला लहानपणी पोलिओमुळे पायातील त्राण गमवावे लागले. त्याला दोन्ही पायांना अर्धांगवायू आला, श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्याच्या पाठीच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा आला. कोल्हापूरच्या मुख्य शहरापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम भागात एका सामान्य कुटुंबात जन्मलेला उन्हाळकर पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल, असे कुणालाही तेव्हा वाटले नसावे. पण, तो हे करणार आहे.

उन्हाळकरने सर्व अडथळे पार करून टोकियो २०२० मध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये SH1 गटात सहभाग घेतला होता आणि त्याचे पदक ०.३ गुणांनी हुकले होते.“ तो दिवस आठवून अजूनही खूप त्रास होतो. पहिल्या १६ शॉट्सनंतर मी अव्वल स्थानावर होतो. पण माझे लक्ष विचलित झाले आणि नंतर चौथ्या क्रमांकावर घसरलो. पण त्या अनुभवातून मी खूप काही शिकलो आहे,” असे उन्हाळकर म्हणाला.

उन्हाळकरचे वडील तेलाच्या दुकानात काम करायचे आणि त्यांची आई आजही कोल्हापुरातील गणेश मंदिरासमोर फुले, अगरबत्ती, हार इत्यादी जीवनावश्यक वस्तू विकण्याचा स्टॉल चालवते. ''मी सुरुवातीला शॉट पुट, भाला, डिस्कस इत्यादी खेळ खेळत होतो. पण हे खेळ खेळण्यासाठी माझ्याकडे शारीरिक क्षमता नाही असे मला वाटले. २००७ मध्ये कुठेतरी मला कोल्हापूर जिल्हा पॅरालिम्पिक संघटनेकडून पॅरा स्पोर्ट्सबद्दल माहिती मिळाली. त्यावेळच्या काही खेळाडूंशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच मला गोष्टी समजल्या. मी नेमबाजीची निवड केली आणि आयुष्यात काय करायचे आहे ते सापडले,” असे उन्हाळकरने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

उधारीची बंदूक अन्...

सुरुवातीला तो त्याच्या प्रशिक्षकांनी दिलेले शस्त्र घेऊन सराव करत असे. “सुरुवातीदरम्यान, प्रशिक्षकाने दिलेले शस्त्र आम्ही चार लोक आलटूनपालटून सरावासाठी वापरायचो. थोडा संघर्ष झाला. पण त्यावेळेस, आम्ही सराव करू शकू असे शस्त्र आमच्याकडे असल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आणि आनंदी होतो,” असे तो म्हणाला. उन्हाळकरने २०१२ मध्ये पहिला राष्ट्रीय स्पर्धा खेळली. तो २०१४ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला. त्या स्पर्धेसाठी त्याने मित्र आणि नातेवाईकांकडून पैशे उधार घेतले.

वडिलांच्या निधनाने खचला..

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नावलौकिक मिळवत असताना उन्हाळकरच्या आयुष्यात धक्कादायक घटना घडली. त्याच्या वडिलांचे निधन झाले. कामाची खराब परिस्थिती आणि अवेळी किंवा शिळे जेवण यामुळे त्यांच्या वडिलांना मूत्रपिंडाचा त्रास झाला आणि त्यांचे निधन झाले. पण अथक परिश्रमाने आणि चिकाटीच्या जोरावर उन्हाळकर पॅरालिम्पिक २०२४ मधील ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान चॅटॉरॉक्स नेमबाजी केंद्रात होणाऱ्या शूटिंग इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT