India Vs Bangladesh Dinesh Karthik Statement  esakal
क्रीडा

IND vs BAN : केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर कोणामुळे भारत हरला? दिनेश कार्तिक म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Bangladesh Dinesh Karthik Statement : बांगलादेशने भारताविरूद्धचा पहिल्या वनडे सामन्यात 1 विकेट राखून जिंकला. तीन सामन्याच्या मालिकेत बांगलादेशने 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारताने जरी 186 धावांचे माफक आव्हान ठेवले असले तरी भारताने चांगला मारा करत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला होता. मात्र शेवटच्या जोडीने 51 धावांची खेळी करत भारताचा विजयी घास हिसकावून घेतला. भारताचा पराभव या भागीदारीमुळे झाला असला तरी भारताने देखील काही अक्षम्य चुका केल्या. याच चुकांवर दिनेश कार्तिकने बोट ठेवत केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना धरले.

बांगलादेशला विजयासाठी ज्यावेळी 34 धावांची गरज होती त्यावेळी बांगलादेशचे 9 फलंदाज बाद झाले होते. मात्र केएल राहुलने मेहदी हसनचा झेल सोडला. यानंतर हसन आणि रेहमानने 10 व्या विकेटसाठी 51 धाावांची भागीदारी रचली आणि सामना जिंकून दिला. याबाबत दिनेश कार्तिकने क्रिकबझशी बोलताना आपले मत व्यक्त केले.

दिनेश कार्तिक म्हणाला की, 'हा एक सोपा झेल होता. तो पकडायला हवा होता. मझी सुंदरबाबत तक्रार आहे. त्याला झेल घेण्यासाठी पुढे यायला पाहिजे होते. मला नाही माहिती की दोघांच्यामध्ये काय झालं मात्र सुंदरसाठी हा झेल सोपा होता. मात्र तो झेल घेण्यासाठी पुढे आलाच नाही. केएला राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरमध्ये हा गोंधळ बॅड लाईट्समुळे झाला की दुसरं कारण होतं हे दोघंच सांगू शकतील.'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर बांगलादेशच्या शाकिब अल हसनने भारताचा निम्मा संघ गारद केला. यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला 186 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. यानंतर भारतीय गोलंदाजांनीही बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत सामन्यावर आपली पकड निर्माण केली होती. बांगलादेशने 40 व्या षटकात 136 धावावर आपली नववी विकेट गमावली होती. मात्र शेवटच्या जोडीने नाबाद 51 धावांती भागीदारी रचून भारताच्या हातून विजय खेचून नेला. मेहदी हसनने 39 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. तर मुस्तफिजूर रहमानने नाबाद 10 धावा करत त्याला शेवटपर्यंत साथ दिली.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT