Dinesh Karthik Rishabh Pant : ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताने ऋषभ पंतला संघात खेळवले पाहिजे अशी जोरदार मागणी होत होती. मात्र भारताने दोनच सामन्यात ऋषभ पंतला संधी दिली. पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये धडाकेबाज डावखुरा फलंदाज म्हणून नावारूपाला आला. मात्र त्याला टी 20 क्रिकेटमध्ये संघात आपली जागा निर्माण करता आलेली नाही. तो संघातून कायम आत बाहेर होत राहिला आहे. दरम्यान, आता भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर टी 20 मालिका खेळत आहे. भारतीय संघात मोठ्या बदलांची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभुमीवर संघातील वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकने ऋषभ पंतबाबत एक सल्ला दिला आहे.
क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिकने ऋषभ पंतला टी 20 क्रिकेटमध्ये सलामीला पाठवले पाहिजे असे मत व्यक्त केले. तो म्हणाला, 'ऋषभ पंत कोणत्या प्रकारची फटकेबाजी करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी फिल्डर्स सर्कलमध्ये असतात त्यावेळी पॉवर प्लेमध्ये खूप धोकादायक फलंदाज ठरू शकतो. त्यामुळे आपण त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी दिली पाहिजे. विशेष म्हणजे आकडेवारी पाहिली तर त्याचा स्ट्राईक रेट हा ज्यावेळी तो सलामी करतो त्यावेळी त्यावेळी चांगला असतो. त्याला सर्कलमध्ये फिल्डर्स असताना फलंदाजी करणे आवडते. त्याला गोलंदाजांवर हल्ला चढवून त्यांच्यावर दबाव आणण्यास आवडते.'
दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, 'ऋषभ पंतला कोठे फलंदाजाली पाठवतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. भारतीय संघासमोर ऋषभ पंतला कसे वापरून घ्यायचे हा मोठे प्रश्न आहे. मला असे वाटते की त्याला वरच्या फळीत फलंदाजी करताना आपण पाहू शकतो. त्याला त्याची गुणवत्ता दाखवण्यासाठी जास्त चेंडू मिळतील. मोठे फटके मारण्यात पंतचा हात कोणी धरू शकत नाही. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आपण तो कधी कधी फेल जाऊ शकतो हे मान्य केलं पाहिजे मात्र ज्यावेळी तो धावा करेल त्यावेळी तो एक अत्यंत धोकादायक खेळाडू ठरू शकतो.'
कार्तिकने पंत टी 20 मध्ये का फिट होत नाहीये याचे कारण देखील सांगितले. तो म्हणाला की, पंत फ्रेंचायजीयकडून फलंदाजी करताना वेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि भारतीय संघाकडून खेळताना तो वेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. जिथे विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आहेत तेथे तुम्ही पंतला कोठे फिट बसवणार. आपल्याला डावखुऱ्या फलंदाजाची गरज आहे हे मान्या आहे. मात्र त्याला खेळवणार कोठे? तुम्ही कोहली, सूर्याला हात लावू शकत नाही. पाचव्या क्रमांकावर पंत आला तर त्याला काय संधी मिळणार त्यामुळे आपण त्याला सलामीला संधी देऊन पहायला हवे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.