Disney+ Hotstar Creates New Viewership Record of 4.3 Crore  
क्रीडा

IND vs NZ : 4.3 करोड...! भारत-न्यूझीलंड सामना रेकॉर्ड ब्रेक, हॉटस्टारने केला नवा जागतिक विक्रम

Kiran Mahanavar

Disney+ Hotstar Creates New Viewership Record of 4.3 Crore : धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 21 वा सामना खेळला गेला. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण, दोन्ही संघांनी या स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता. सामन्यादरम्यान संपूर्ण स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. मैदानावर या सामन्याची क्रेझ सुरू असतानाच, ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रमी संख्येने लोकांनी हा शानदार सामना थेट पाहिला. या वर्ल्ड कपच्या सामन्याने प्रेक्षकसंख्येचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले.

हॉटस्टारवर 3.5 कोटींहून अधिक लोक भारत-न्यूझीलंड सामना एकाच वेळी पाहत होते. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा खेळत होते, तेव्हा विक्रमी 4.3 कोटी प्रेक्षक सामना पाहत होते.

भारत-न्यूझीलंड सामन्यात भारत-पाकिस्तान सामन्याचा विक्रम मोडला गेला. त्याच महिन्यात, 14 ऑक्टोबरला 3.5 कोटी लोकांनी हॉटस्टारवर भारत-पाकिस्तान सामना पाहिला होता. यापूर्वी आशिया कप 2023 मध्ये 2.8 कोटी लोकांनी ऑनलाइन सामना पाहिला होता.

जागतिक सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. याशिवाय चाहते डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. विक्रमी 4.3 कोटी लोकांनी भारत-न्यूझीलंड सामना डिस्ने प्लस हॉटस्टार अर्थात OTT वर थेट पाहिला. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. आतापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी क्रिकेटचा सामना लाइव्ह पाहिला नव्हता. आशिया कप 2023 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेलेला सुपर फोर सामना 2.8 कोटी लोकांनी थेट पाहिला होता.

काय घडलं मॅचमध्ये?

भारताने न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. यासह एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मधील किवी संघाचा विजय रथ थांबला, तर टीम इंडिया अजूनही या स्पर्धेत अजिंक्य आहे. या विजयासह भारतीय संघाचे 10 गुण झाले असून भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडला पहिला पराभव पत्करावा लागला असून हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्व 10 गडी गमावून 273 धावा केल्या. तर भारताकडून विराट कोहलीने 95 धावांची खेळी खेळली. रोहित शर्माने 46 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 39 धावा केल्या. श्रेयसने 33, राहुलने 27 आणि गिलने 26 धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचा पुढील सामना 29 ऑक्टोबरला इंग्लंडशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT