Gambhir and Sreesanth Controversy News : सध्या सुरू असलेल्या लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू खेळत आहे. याच स्पर्धेच्या एका सामन्यादरम्यान माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यांच्यात बाचाबाची झाली. यावरून मोठा गदारोळ झाला आहे.
दोघांमधील प्रकरण इतके बिघडले की इतर खेळाडू आणि पंचांना हस्तक्षेप करावा लागला. नंतर श्रीसंतने व्हिडिओ बनवला आणि गंभीरने त्याला खेळपट्टीवर काय म्हटले होते यावर मोठा खुलासा केला आहे.
लेजेंड्स लीग क्रिकेटच्या या सामन्यादरम्यान गौतम गंभीरने श्रीसंतच्या चेंडूंवर षटकार-चौकारचा पाऊस पाडला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका चेंडूनंतर श्रीसंत गंभीरकडे पाहत आहे आणि गौतम गंभीरही त्याला काहीतरी म्हणत आहे. आणि गोलंदाजी करण्याचा इशारा देत आहे. तर दुसर्या व्हिडिओमध्ये असे दिसते की दोन्ही खेळाडू नंतर समोरासमोर आले आहे आणि इतर खेळाडू त्यांना थांबवत आहे.
सामन्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्ट केले. एका व्हिडीओमध्ये तो मैदानाबाहेर उभा आहे, आणि गौतम गंभीर सर्वांशी भांडत असल्याचे सांगत आहे. त्याने विराट कोहलीसह अनेक माजी दिग्गजांची नावे घेतली ज्यांच्याशी गंभीरचे भांडण झाले. यांची सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा - Gambhir vs Sreesanth : 'मिस्टर फायटरची वाईट सवय...' गंभीरसोबतच्या भांडणानंतर श्रीसंतने व्हिडिओ बनवून केला मोठा गौप्यस्फोट
याशिवाय श्रीसंतने इंस्टाग्रामवर अजून एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्याने गंभीरसोबत खेळपट्टीवर काय झाले हे सांगितले आहे. तो म्हणाला की, मैदानात गौतम गंभीर मला फिक्सर-फिक्सर म्हणत होता. अंपायरसमोरही तो मला फिक्सर म्हणत राहिला. आणि गोलंदाजी करण्यास सांगितले. मी तेथून निघून गेल्यावरही तो तोच शब्द वापरत राहिला. तर मी त्याच्याविरुद्ध एकही वाईट शब्द वापरला नाही. अनेक लोकांशी ते हे करत आहेत. गौतम गंभीरकडे भरपूर पैसा आहे आणि त्याचा पीआरही खूप मजबूत आहे. श्रीशांतचे दोन्ही व्हायरल व्हिडिओ येथे पहा..
या संपूर्ण घटनेनंतर गौतम गंभीरने एक ट्विट देखील केले. ज्यामध्ये त्याने स्वतःचा एक हसणारा फोटो पोस्ट केला. आणि असे लिहिले की, जेव्हा जगाचे लक्ष स्वतःकडे वेधायचे असते तेव्हा ते हसू.
श्रीशांत आणि गौतम गंभीर यांच्यातील भांडणाचा हा मुद्दा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक आपली मते मांडत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की याआधी आयपीएल दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लखनऊ सुपर जायंट्सचा सामना झाला तेव्हा गौतम गंभीरची विराट कोहलीशी झुंज झाली होती. त्या सामन्यानंतरही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.