Cricket DRS Rules
Cricket DRS Rules Esakal
क्रीडा

Explained: DRS साठी खेळाडूंना सपोर्ट स्टाफची मदत घेता येते का? वाचा, काय सांगतो नियम

आशुतोष मसगौंडे

बांगलादेशवर नेपाळविरुद्धच्या T20 विश्वचषकातील 2024 सामन्यात DRS घेताना फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. फलंदाजी करताना नॉन-स्ट्रायकर जाकेर अलीने ड्रेसिंग रूमकडे पाहत मदत मागितल्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

या सर्व प्रकारामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, मैदानावरील खेळाडू डीआरएस घेण्यासाठी सपोर्ट स्टाफची मदत घेऊ शकतो की नाही.

काय आहे प्रकरण?

बांगलादेशच्या डावाच्या 14व्या षटकात तनझिम हसन साकिब संदीप लामिछानेच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर नॉन-स्ट्रायकवर असलेला बांगलादेशचा फलंदाज जाकेर अलीने तनझिम हसन शाकिब रिव्ह्यू घेत नसल्याचे लक्षात येता त्याने ड्रेसिंग रूमकडे पाहत रिव्ह्यू घ्यायचा की नाही यासाठी मतद मागितली.

सपोर्ट स्टाफची मदत घेण्याबाबत आयसीसीचा नियम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) DRS दरम्यान खेळाडूंच्या संवादाबाबत कठोर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. खेळाडूंना केवळ थेट सहभागी असलेल्या संघ सहकाऱ्याशी DRS घेण्याबाबत चर्चा करण्याची परवानगी आहे आणि ते यासाठी सपोर्ट स्टाफचा सल्ला घेऊ शकत नाहीत.

कलम 3.2.3 नुसार, खेळाडूंना मैदानाबाहेरून इनपुट मिळाल्याचे लक्षात येताच पंच DRS कॉल नाकारू शकतात. ICC च्या आचारसंहितेचा अनुच्छेद 2.15 देखील खेळाडूंना निलंबन आणि संभाव्य दंडांसह, डीआरएस घेण्यासाठी मैदानाबाहेरील मदत घेण्यास प्रतिबंधित करते.

डीआरएस नियम काय आहे?

डीआरएसचे म्हणजे Decision Review System. या अंतर्गत, जर एखाद्या खेळाडूला असे वाटत असेल की, पंचाने चुकीचा निर्णय घेतला आहे, तर गोलंदाजी संघाचा कर्णधार आणि फलंदाजीच्या बाजूने स्ट्राइकवर असलेला खेळाडू तिसऱ्या पंचाच्या मदतीने डीआरएसची घेऊ शकतो. मात्र, यासाठी १५ सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. 15 सेकंदांनंतर डीआरएस घेतल्यास तो अवैध ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma : शिव्या देतो... प्लेअरची धरतो कॉलर तरी कॅप्टन रोहित सर्वांना हवा हवासा का वाटतो?

DY Chandrachud: CJI चंद्रचूड यांचा न्यायाधिशांना महत्वाचा सल्ला; स्वतः ला देव अन्...

Ind vs Sa T20 WC Final Live Score : भारत-आफ्रिका संघ अंतिम सामन्यासाठी पोहोचला स्टेडियममध्ये, थोड्याच वेळात होणार टॉस

Arvind Kejriwal : ''अरविंद केजरीवालांची कोठडी आम्हाला नकोय..'', CBIने कोर्टात मांडलं म्हणणं; त्यावर न्यायाधीश म्हणाले...

Car Accident : दिघी-आळंदी मार्गावर कारची दुचाकीला जोराची धडक; तरुणाचा जागीच अंत, एकजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT