भारताचा आजही मोठ्या विजयासाठी प्रयत्न sakal
क्रीडा

दुबई : भारताचा आजही मोठ्या विजयासाठी प्रयत्न

स्कॉटलंडविरुद्धचा सामना; फलंदाजांवर मदार, गोलंदाजीत सुधारणा आवश्यक

सुनंदन लेले

दुबई : आयसीसीची स्पर्धा असली तरी भारत वि. स्कॉटलंड सामन्याला तसे कोणी खूप महत्त्व देत नसते. यंदा परिस्थिती थोडी बदलली आहे. एकीकडे स्कॉटलंड संघाने बऱ्यापैकी चांगला खेळ सातत्याने करून दाखवला आहे; तर दुसरीकडे भारतीय संघाला कसेही करून मोठ्या विजयाची गरज आहे. चांगली गोष्ट अशी आहे, की पात्रता स्पर्धा खेळून मुख्य स्पर्धेत आलेल्या इतर संघांपेक्षा स्कॉटलंडचा संघ ‘धरपकड’ नव्हे, तर मूळ खेळाडूंमुळे जास्त खरा वाटतो आहे.

अफगाणिस्तान सामन्यानंतर बोलताना उपकर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले, की पहिल्या दोन सामन्यांत आमचा खेळ मनासारखा झाला नाही. फलंदाजांना परिस्थितीशी जुळवून घेता आले नाही. तिसऱ्या सामन्यात मनासारखी फलंदाजी झाली आणि सगळे चित्र बदलले. भारतीय संघ व्यवस्थापन आता फार पुढचा विचार करत नाहीय. आम्ही फक्त विजयाची लय कायम ठेवायला सातत्यपूर्ण खेळ करायच्या विचारात आहोत. आमची स्पर्धेतील प्रगती आमच्या चांगल्या खेळाबरोबरीने अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड सामन्यात काय होते यावर अवलंबून आहे.

स्कॉटलंड संघाला एकदम कमजोर कोणी मानत नाहीय त्याचे कारण त्यांच्या संघात तगडे तंदुरुस्त खेळाडू आहेत, ज्यांना खेळाचा भरपूर अनुभव आहे. ब्रॅड व्हील आणि सफियान शरीफने नवीन चेंडू टाकताना चांगला मारा केला आहे. गेल्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलाच त्रास दिला होता. मार्टीन गुप्टीलने शेवटपर्यंत उभे राहून नंतर मोठे फटके मारले म्हणून न्यूझीलंड संघाला १७० च्या पुढे धावा काढता आल्या. स्कॉटलंडकडून कोणीच मोठी खेळी केली नाही, पण सगळ्यांनी योगदान दिल्याने न्यूझीलंड संघाला धास्ती वाटण्याइतपत दीडशे धावांचा टप्पा गाठला हे विसरून चालणार नाही. म्हणूनच भारतीय संघ शुक्रवारचा सामना पूर्ण ताकदीनिशीच खेळेल ही खात्री वाटते.

गेल्या सामन्याप्रमाणेच स्कॉटलंडसमोर मोठी धावसंख्या उभारण्याकडे भारतीय फलंदाजांना कल असेल. उपांत्य फेरी गाठण्याची अत्यंत पुसट आशा दुसऱ्या संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे तशीच ती चांगल्या धावगतीवरही विसंबून आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातसुद्धा महंमद शमी आणि शार्दुल ठाकूरला फलंदाजांनी मोठे फटके मारले होते. त्याउलट चार वर्षांनी संधी मिळून अश्विनने परिणाम साधणारा मारा केला होता हे जाणकारांच्या चांगलेच नजरेत भरले आहे.

नेहमी खूप गार हवेत खेळणाऱ्या स्कॉटिश खेळाडूंना दुबईच्या गरम हवेत खेळायचे मोठे आव्हान आहे. भारतीय संघ अजून स्कॉटलंडसमोर सामना खेळला नसल्याने त्याचीही उत्सुकता आहे. शुक्रवारी सुट्टीचा दिवस साधून किती प्रेक्षक रस नसलेला सामना बघायला मैदानात हजेरी लावतात याचा अंदाज संयोजकांनाही येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT