Duleep Trophy 2023 Final Cheteshwar Pujara esakal
क्रीडा

Duleep Trophy 2023 Final : पुजारासाठी परतीचे दोर कापले, सूर्याही 'कसोटी'त नापास; विहारीचं नाणं मात्र खणखणीत!

अनिरुद्ध संकपाळ

Duleep Trophy 2023 Final : दुलीप ट्रॉफी 2023 च्या अंतिम सामन्यात शेवटच्या दिवशी दक्षिण विभागाने पश्चिम विभागाचा दुसरा डाव 222 धावात संपवत सामना 75 धावांनी खिशात टाकला. दक्षिण विभागाने स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या पश्चिम विभागाला पराभावची धूळ चारत दुलीप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. (South Zone Won Duleep Trophy 2023)

पश्चिम विभागात धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ, भारतीय संघातील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा, आयपीएल, टी 20 वर्ल्डकप गाजवणारा सूर्यकुमार यादव, शतकांचा रतीब घालणारा सर्फराज खान यांचा समावेश होता. मात्र तरी देखील पश्चिम विभागाला दक्षिण विभागासमोर शरणागती पत्करावी लागली. (Cheteshwar Pujara)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण विभागाने हनुमा विहारीच्या 63 अन् तिलक वर्माच्या 40 धावांच्या जोरावर सर्वबाद 213 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पश्चिम विभागाच्या पृथ्वी शॉचा (Prithvi Shaw) (65) अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाचा विद्वत कवेराप्पासमोर टिकाव लागला नाही. (Cricket News In Marathi)

कवेरप्पाने तब्बल 7 विकेट्स घेत पश्चिम विभागाचा पहिला डाव 146 धावात संपवला. पुजाराने 9, सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 8 तर सर्फराज खानने (Sarfaraz Khan) 0 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या डावात दक्षिण विभागाने 230 धावा केल्या. त्यातही विहारीने सर्वाधिक 48 धावांचे योगदान दिले. पश्चिम विभागाला विजयासाठी 297 धावांची गरज होती. मात्र त्यांना 222 धावांपर्यंतच मजल मारता आली.

त्यातही संघाचा कर्णधार प्रियंक पांचाळच्या झुंजार 95 धावा अन् सर्फराजच्या 48 धावांची खेळी सोडली तर इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. पुजारा 15 धावा तर सूर्यकुमार यादव 4 धावांची भर घालून परतला. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने दोन्ही डावात मिळून 24 तर सूर्यकुमार यादवने 12 आणि सर्फराज खानने 48 धावा केल्या. पृथ्वी शॉने दोन्ही डावात मिळून 72 धावांचे योगदान दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT