Vinesh Phogat disqualified esakal
क्रीडा

Inside story Vinesh Phogat : जेवली नाही, झोपली नाही, केस कापले, रक्त काढलं; तरीही फक्त १०० ग्रॅममुळे स्वप्न भंगलं!

Vinesh Phogat Support staff efforts for Weight Reduce: नियमांनुसार, कुस्तीपटूंना प्राथमिक फेरीच्या सकाळी आणि पुन्हा अंतिम फेरीच्या दिवशी, असे दोनदा वजन करणे आवश्यक आहे. विनेशने मंगळवारी सकाळी पहिल्या वजनात ५० किलो वजनाची मर्यादा यशस्वीरित्या पूर्ण केली. पण...

Swadesh Ghanekar

Vinesh Phogat Sleepless night : कोणत्याची खेळाडूच्या वाट्याला असा दिवस येऊ नये, तो भारताच्या विनेश फोगाटच्या वाट्याला आला. मागील वर्षभर जंतरमंतरवरील आंदोलानमुळे प्रचंड टीकेचा सामना करावा लागणाऱ्या विनेशने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांना सडेतोड उत्तर दिले. ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिने प्रवेश करून इतिहास घडवला. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची फायनलमध्ये प्रवेश मिळवणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

१७ ऑगस्ट २०२३ मध्ये विनेशच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती आणि ८ दिवसांनी म्हणजेच २३ ऑगस्टला तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी लवकरच पुन्हा पायावर उभं राहण्याचे वचन दिले होते आणि आज ६ ऑगस्टला २०२४ मध्ये ती ऑलिम्पिक फायनल खेळणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली. पण, बुधवारचा दिवस तिच्यासाठी एक वाईट बातमी घेऊन आला.. १०० ग्राम वजन अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवले गेले.

२ किलो वजन करण्यासाठी काय नाय केलं...

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला डिहायड्रेशनमुळे चक्कर आल्याचे वृत्त समोर येत आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते आणि ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती. त्यामुळे तिला डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचे वृत्त समोर येत आहे. जेव्हा तिला अपात्र ठरवले गेले, तेव्हा तिला चक्कर आली आणि उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

तीन बाउट्समध्ये भाग घेतल्यानंतर आणि दिवसभर स्वतःला रिकव्हर केल्यानंतर, विनेशचे वजन वाढल्याची शक्यता आहे. अंतिम वजनासाठी आवश्यक वजन पूर्ण करण्यासाठी तिला रात्रभर अंदाजे २ किलो वजन कमी करावे लागले. विनेशला तिच्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर घामाच्या सूटमध्ये काहींनी पाहिले आणि तिने रात्रभर जास्तीचे वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तिच्या प्रयत्नांनंतरही, विनेशचे वजन १०० ग्रॅम वजनाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.

तिचे केसही कापले...

विनेश, तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी कालची रात्र आव्हानात्मक होती. विनेशने वजन कमी करण्यासाठी काही खाल्ले नाही किंवा पाणीही प्यायली नाही. सर्व उपाय करून झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विनेशचे केसही कापले गेले आणि रक्तही काढले गेले. पण तरीही अपयश आले, असे वृत्त स्पोर्टस्टारने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT