ENG Vs AUS Ashes 2023 : पावसाचा व्यत्यय त्यात दोलायमान स्थिती अशा परिस्थितीत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या समन्यात ऑस्ट्रेलियाने सनसनाटी विजय मिळवला आणि पहिल्या अॅशेस कसोटीत इंग्लंडवर दोन विकेटने मात केली.
गोलंदाजीत चमक दाखवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस फलंदाजीतही चमकला. संघ अडचणीत असताना त्याने नाबाद ४४ धावांची निर्णायक खेळी केली. निर्णायक क्षणी त्याला नॅथन लायनने मोलाची साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ५५ धावांची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियाने आठवा फलंदाज गमावला आणि लायन मैदानात आला त्यावेळी त्यांना विजयासाठी ५४ धावांची गरज होती. पण लायन आणि कमिंस यांनी कमाल केली. कमिंसने रूटच्या एका षटकात मारलेले दोन षटकार त्याला आत्मविश्वास मिळवून देणारे ठरले.
पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रापर्यंत रंगलेल्या या समन्यात ऑस्ट्रेलियाला आज विजयासाठी १७४ धावांची गरज होती आणि सात फलंदाज शिल्लक होते, परंतु पावसामुळे जवळपास पहिले सत्र वाया गेले.
त्यानंतर खेळ सुरू झाल्यावर इंग्लिश गोलंदाजांनी टप्या टप्याने एकेक फलंदाज बाद केले. मात्र ख्वाजा एक बाजू लढवत होता. कॅमेरुन ग्रीन आणि अलेक्स केरी यांनी त्याला साथ दिली, परंतु स्टोक्सने ख्वाजाला बाद केल्यावर इंग्लंडचा मार्ग मोकळा झाला असे वाटत असताना कर्णधार कमिंसने बाजी पलटवणारी फलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड, पहिला डाव : ८ बाद ३९३ घोषित.
ऑस्ट्रेलिया, पहिला डाव : ३८६ इंग्लंड, दुसरा डाव : २७३
ऑस्ट्रेलिया, दुसरा डाव : ८ बाद २८२ (उस्मान ख्वाजा ६५, डेव्हिड वॉर्नर ३६, कॅमेरुन ग्रीन २८, अलेक्स केरी २०, पॅट कमिंस नाबाद ४४, नॅथन लायन नाबाद १६, स्टूअर्ट ब्रॉड ६४-३, रॉबिन्सन ४३-२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.