ind vs eng  sakal
क्रीडा

ENG vs IND: एजबेस्टन कसोटीत वर्णद्वेषी टिप्पणी करणाऱ्या प्रेक्षकाला अटक

कसोटी सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांशी वर्णद्वेषी गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर बर्मिंगहॅम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे

Kiran Mahanavar

England vs India: इंग्लंड आणि भारत यांच्या एजबॅस्टन येथे पाचव्या कसोटी सामना खेळल्या गेला. या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय चाहत्यांशी वर्णद्वेषी गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर बर्मिंगहॅम पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बर्मिंगहॅम पोलिसांनी अटक केल्याची माहिती ट्विटवर दिली आहे. त्याला चौकशीसाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. इंग्लंडने शेवटच्या दिवशी ही कसोटी 7 गडी राखून जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी नाबाद शतके झळकावली.(eng vs ind police arrest man after racism allegations)

कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान इंग्लिश चाहत्यांच्या एका गटाने भारतीय चाहत्यांबद्दल असभ्य कमेंट केल्या होत्या, ज्याच्या तक्रारी ट्विटरच्या माध्यमातून जगासमोर आल्या होत्या. यानंतर एजबॅस्टनचे अधिकारी आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली. वेस्ट मिडलँड्स पोलिसांच्या प्रवक्त्याने स्काय स्पोर्ट्स न्यूजला सांगितले की, बर्मिंगहॅममधील कसोटी सामन्यादरम्यान वर्णद्वेषी, अपमानास्पद वागणुकीच्या वृत्ताचा आम्ही तपास सुरू केला आहे.

एका युजरने ही घटना सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ही गोष्ट समोर आली आहे. त्याने लिहिले की, स्टँडवर असलेल्या भारतीय चाहत्यांशी थेट वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या जात आहे. एजबॅस्टनच्या अधिकाऱ्यांना हे कळताच त्यांनी चाहत्यांची माफी मागितली. एजबॅस्टनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, आम्ही एजबॅस्टनमध्ये सर्वांसाठी सुरक्षितचे वातावरण निर्माण करत आहोत, अशा प्रतिक्रिया ऐकून आम्हाला धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT