eng vs ind suryakumar yadav hits century against england सकाळ
क्रीडा

सूर्यकुमार यादवने ठोकले धमाकेदार शतक, रोहित-रैनाच्या यादीत समावेश

सूर्यकुमार यादवने 24 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले.

Kiran Mahanavar

Eng vs Ind Suryakumar Yadav Hits Century : नॉटिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडने भारतावर 17 धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतरही टीम इंडियाने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने 24 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिले शतक झळकावले. त्याने 48 चेंडूत 12 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा 5वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी ही कामगिरी केली आहे.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि कर्णधार जोस बटलर यांनी भारतीय संघात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीचा पुरेपूर फायदा उठवत इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. डेव्हिड मलानचे (77) स्फोटक अर्धशतक आणि लियाम लिव्हगस्टीनच्या नाबाद 42 धावांच्या जोरावर इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 215 अशी भक्कम धावसंख्या उभारली.

216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत (1), विराट कोहली (11), कर्णधार रोहित शर्मा (11) आणि दिनेश कार्तिक (6) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र सूर्यकुमारने अवघ्या 48 चेंडूत शतक झळकावले. चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो केएल राहुलनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. इंग्लंडने शेवटचा T20 सामना 17 धावांनी जिंकला, भारताने मालिका 2-1 ने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT