PAK vs ENG 
क्रीडा

PAK vs ENG: 'टॉयलेटपर्यंत आमचा...', पाकमधील सुरक्षा व्यवस्थेमुळे इंग्लंडचा फलंदाज त्रस्त

पाकिस्तानने खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली आहे मात्र काही वेळा अतिसुरक्षा व्यवस्थेमुळे...

Kiran Mahanavar

Pakistan vs England : इंग्लंडचा संघ सध्या सात टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावर हल्ला झाला होता. त्यानंतर बराच काळ कोणत्याही देश तेथे खेळायला गेला नाही. काही काळापासून मोठमोठे संघ तिथे जाऊ लागले आहेत. पाकिस्ताननेही खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कडक व्यवस्था केली आहे. मात्र काही वेळा अतिसुरक्षा व्यवस्थेमुळे खेळाडू त्रस्त होऊ लागले आहे.

इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने सुरक्षा व्यवस्थेमुळे त्रस्त झाला आहे. मॅचनंतर हॅरी ब्रूक गंमतीने म्हणाला, मी प्रत्येक वेळी टॉयलेटमध्ये जातो तेव्हा कोणीतरी माझा पाठलाग करत असतो. मी याआधी असे काहीही अनुभवले नव्हते, पण छान आहे. आम्हाला इथे खूप सुरक्षित वाटते. आम्ही सर्वजण पाकिस्तान दौऱ्याचा आणि या कडक सुरक्षेचा आनंद घेत आहोत.

मोठ्या संघांचे सातत्याने आगमन होत असल्याने पाकिस्तानमधील क्रिकेटची स्थिती सुधारत आहे. पुढील वर्षी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. याशिवाय 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनही करायचे आहे. सुरक्षेतील त्रुटींमुळे कोणतीही घटना घडू नये आणि त्यामुळे यजमानांचे नुकसान होऊ नये असे पाकिस्तानला वाटते.

सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सात विकेट्सवर 158 धावा केल्या होत्या. मोहम्मद रिझवानने 46 चेंडूत 68 तर बाबर आझमने 24 चेंडूत 31 धावा केल्या. इंग्लंडने हा सामना सहा गडी राखून जिंकला. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने 40 चेंडूत 53 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT