क्रीडा

PAK vs ENG : इंग्लंडचा संघ पाकिस्तानात दाखल! हेलिकॉप्टरमधून देखरेख तर दुकाने, कार्यालये बंद

अनिरुद्ध संकपाळ

PAK vs ENG | कराची : इंग्लंडचा क्रिकेट संघ आज पाकिस्तानातील कराचीत दाखल झाला आहे. इंग्लंडचा हा तब्बल 17 वर्षानंतर पहिला पाकिस्तान दौरा आहे. यापूर्वी इंग्लंडचा क्रिकेट संघ पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार देत होता. इंग्लंडने 2005 ला शेवटचा इंग्लंड दौरा केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंड पाकिस्तानचा दौरा करणार होते. मात्र न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्या अर्ध्यावर सोडला त्यानंतर इंग्लंडने देखील आयत्यावेळी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली होती. (England Cricket Team Landed Pakistan After 17 Years Tight Security Arrangement Provided)

पाकिस्तानात 2009 मध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्या होम सिरीज युएईमध्ये खेळवाव्या लागल्या होत्या. त्यावेळी 2012 आणि 2015 मध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झाल्या होत्या.

आता पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट हळूहळू मूळ पदावर येत आहे. नुकताच ऑस्ट्रेलियाने देखील पाकिस्तानचा यशस्वी दौरा केला होता. आता इंग्लंड पाकिस्तानचा दौरा करत आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही संघ 7 टी 20 सामने खेळणार आहेत. त्यानंतर डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड पुन्हा एकदा पाकिस्तानात येणार आहे.

इंग्लंडच्या संघासाठी पाकिस्तानने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सामन्याच्या दिवशी इंग्लंडचा संघ हॉटेलपासून कराची नॅशनल स्टेडियमकडे ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्यावर नाकाबंदी केली जाईल. तसेच त्यावर सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. याचबरोबर इंग्लंड संघाच्या प्रवासादरम्यान, हेलिकॉप्टरद्वारे देखरेख करण्यात येणार आहे. ज्या मार्गावरून इंग्लंडचा संघ जाणार आहे त्या मार्गावरील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानातील सुरक्षा अधिकच कडक करण्यात आली आहे. मार्च महिन्यात पेशावरमध्ये मशिदीत आत्मघातकी हल्ला झाला होता. या बॉम्बस्फोटात 64 लोकांचा मृत्यू झाला होता. हा पाकिस्तानातला 2018 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

SCROLL FOR NEXT