England Defeat New Zealand T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज इंग्लंडने ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचा 20 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणारी इंग्लंड वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच आपल्या खऱ्या रंगात दिसली. कर्णधार जॉश बटलरने 47 धावात 73 धावांची तुफानी खेळी केली. तर अॅलेक्स हेल्सने 40 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी करत आपल्या कर्णधाराला उत्तम साथ दिली. या दोघांनी 10 षटकात 81 धावांची सलामी दिली. यामुळे इंग्लंडने 20 षटकात 6 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या न्यूझीलंडला 20 षटकात 6 बाद 159 धावांपर्यंतच मजल मारता आली. किवींकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 62 धावा केल्या. या विजयाबरोबरच इंग्लंड आता गुणतालिकेत 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहचली आहे.
आज टी 20 वर्ल्डकपमधील ग्रुप 1 मधील दोन सामने पार पडले. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडचा पराभव करत आपले दुसरे स्थान पुन्हा पटकावले. ग्रुप 1 मधील सर्व संघांचे प्रत्येकी 4 सामने झाले आहेत. सध्याच्या घडीला गुणतालिकेत न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे सामन म्हणजे प्रत्येकी 5 गुणांवर आहेत. मात्र सरस धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड अव्वल स्थानावर, इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या तिघांमध्येच सध्या तरी सेमी फायनल पार करण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.
गुणतालिकेवर नजर टाकली तर न्यूझीलंड +2.233 धावगती राखत अव्वल स्थानावर आहे. धावगतीमध्ये त्यांना मागे टाकणे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला शक्य होईल असे दिसत नाही. इंग्लंडची धावगती +0.547 आहे तर ऑस्ट्रेलियाची -0.304 इतकी कमी आहे. या तीनही संघाचे अजून एक एकच सामने शिल्लक आहेत. जर या तीनही संघांनी आपले पुढचे सामने जिंकले तर सरस धावगतीमुळे न्यूझीलंड आणि इंग्लंडला फारसा धोका नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला डेंजर झोनमध्ये आहे. जरी ऑस्ट्रेलिया जिंकली तरी त्यांना इंग्लंड किंवा न्यूझीलंड पुढच्या सामन्यात पराभूत होण्याची वाट पहावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.