England Defeat Pakistan In 1st Test  esakal
क्रीडा

PAK vs ENG : पाकिस्तान जिंकता जिंकता हरले! पहिल्याच कसोटीत इंग्लंडने लोळवले

अनिरुद्ध संकपाळ

England Defeat Pakistan In 1st Test : तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या इंग्लंडने पाकिस्तानला पहिल्याच कसोटीत पाणी पाजले. इंग्लंडने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव करत पाकिस्तानचा विजयी घास हिसकावून घेतला. विशेष म्हणजे इंग्लंडचा हा पाकिस्तानमधील फक्त तिसरा कसोटी विजय आहे.

दुसऱ्या डावात पाकिस्तानला विजयासाठी 360 धावांची गरज होती. मात्र पाकिस्ताने पाचव्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात विजयासाठी 86 धावांची गरज होती. पाकिस्तानच्या हातात अजून 5 विकेट्स शिल्लक होत्या. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी शेवटच्या सत्रात भेदक मारा केला. ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी पाकिस्तानचा दुसरा डाव 268 धावांवर संपवला. पाकिस्तानची शेवटची जोडी नसीम शाह आणि मोहम्मद अली यांनी 88 व्या षटकापर्यंत लढत देत सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला. मात्र जॅक लिचने हा प्रयत्न हाणून पाडला.

रावळपिंडीच्या पाटा विकेटवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्याच दिवशी 506 धावा ठोकत धावांचा पर्वत उभारला. पहिल्याच दिवशी चार जणांनी शतकी खेळी केली. इंग्लंडने पहिल्या डावात 101 षटकात 657 धावा ठोकल्या. यात हॅरी ब्रुक (153), झॅक क्राऊली (122), डकेट (107) आणि ऑली पोप (108) यांनी शतकी खेळी केली. पाकिस्तानकडून झायेद मेहमूदने 4 तर नसीम शाहने 3 विकेट्स घेत अखेर इंग्रजांचा डाव 654 धावात संपवला. यानंतर पाकिस्तानने देखील पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत सर्वबाद 576 धावा केल्या. पाकिस्ताकडूनही शफिक (114), इमाम उह हक (121), बाबर आझमने (136) यांनी शतकी खेळी केली. सामन्यात पडणारा धावांचा पाऊस पाहून सामना अनिर्णित होणार की काय शक्यता वर्तवली जात होती. मात्र इंग्लंडने पहिल्या डावात 78 धावांची आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात इंग्लंडने 7 बाद 264 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 342 धावांचे आव्हान ठेवले. पहिल्या डावात 153 धावांची दिडशतकी खेळी करणाऱ्या हॅरी ब्रुकने दुसऱ्या डावात देखील 87 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात पाकिस्तानने खराब सुरूवातीनंतर सामन्यावर पकड मिळवण्यास सुरुवात केली होती. इमाम उल हक (48) अझर अली (40) यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. यानंतर सौद शकील (76) आणि मोहम्मद रिझवान (46) यांनी पाकिस्तानच्या विजयाची आशा पल्लवित केली. पाचव्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात पाकिस्तानच्या हातात 5 विकेट्स होत्या आणि विजयासाठी त्यांना 86 धावांची गरज होती. मात्र रॉबिन्सन आणि अँडरसन यांनी प्रभावी मारा करत 9 बाद 264 धावा अशी केली. सामना इंग्लंडच्या हातात आला होता.

दरम्यान, नसीम शाह आणि मोहम्मद अली यांनी तब्बल 12 षटके खेळून काढत शेवटपर्यंत झुंज दिली. हे दोघे इंग्लंडला विजयापासून दूर ठेवणार असे वाटत असतानाच जॅक लीचने 46 चेंडूत 6 धावा करणाऱ्या नसीम शाहला बाद करत शेवटच्या क्षणी विजयावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा : First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT